भारताचा सलामीवीर शिखर धवनच्या अंगठय़ाला दुखापत झाली असून तो तीन आठवडे खेळू शकणार नसल्याचे वृत्त धडकताच समाजमाध्यमांवर याबाबत विभिन्न प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यात कुणी हळहळले, तर कुणी तिरके बाण मारले आहेत. त्यातही काही माध्यमवीरांनी ‘लगान’मधील भुवन आणि त्याचे अन्य तीन सहकारी झुडपातून क्रिकेट बघत असल्याचे छायाचित्र टाकून त्याखाली ऋषभ पंत, अंबाती रायुडू, पृथ्वी शॉ आणि मनीष पांडे हे चौघे ‘बीसीसीआय’च्या कार्यालयाकडे डोळे लावून बसले असल्याचे टाकत आपल्याला कधी बोलावणे येईल, याच प्रतीक्षेत असल्याचे म्हटले आहे. समाजमाध्यमांवर या ‘ट्वीट’ला अनेकांनी पसंती दिल्याने मंगळवारी तोच मुद्दा चर्चेच्या केंद्रस्थानी आला होता.
संग्रहित लेख, दिनांक 12th Jun 2019 रोजी प्रकाशित
चर्चा तर होणारच.. : चौघे प्रतीक्षेत!
समाजमाध्यमांवर या ‘ट्वीट’ला अनेकांनी पसंती दिल्याने मंगळवारी तोच मुद्दा चर्चेच्या केंद्रस्थानी आला होता.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 12-06-2019 at 01:58 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shikhar dhawan thumb injury and replacement fir other four option