नवी दिल्ली:  केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी राज्याच्या राजकारणात लक्ष घातले तर, शिवसेना व भाजपमध्ये पुन्हा मैत्रीचा पूल बांधला जाऊ शकतो, असे विधान राज्यमंत्री व शिवसेनेचे नेते अब्दुल सत्तार यांनी मंगळवारी केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सत्तार यांनी मराठवाडय़ातील विकासकामांसंदर्भात गडकरी यांची भेट घेतली. नितीन गडकरी हे देशाच्या राजकारणातील चालते-बोलते विद्यापीठ आहेत. त्यांनी पूल बांधायचे ठरवले तर ते कसेही आणि कुठेही उभे राहू शकतात. भाजप आणि शिवसेना यांच्यामध्ये पुन्हा मैत्रीचा पूल उभारून दोन्ही पक्षांमधील नातेसंबंध जोडले जाऊ शकतात. गडकरी यांनी मनावर घेतले तर ते उद्धव ठाकरे यांची भेट घेऊ शकतील. गडकरी व अमित शहा यांनी पुढाकार घेतला तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही, असे सत्तार वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sena s minister of state abdul sattar meet nitin gadkari zws
First published on: 05-01-2022 at 00:33 IST