पीटीआय, नवी दिल्ली : Shraddha Walker murder case result श्रद्धा वालकर हत्येप्रकरणी शनिवारी दिल्लीमधील अतिरिक्त सत्र न्यायालयाने निकाल राखीव ठेवला. हा निकाल २९ एप्रिलला जाहीर केला जाणार आहे. या खटल्यात आफताब पूनावाला हा मुख्य आरोपी असून त्याच्यावर श्रद्धाची गळा दाबून हत्या केल्याचा आणि तिच्या मृतदेहाचे तुकडे करून त्यांची विल्हेवाट लावल्याचा आरोप आहे. या खटल्यातील युक्तिवाद शनिवारी संपला. त्यानंतर अतिरिक्त सत्र न्यायाधीश मनीषा खुराणा यांनी खटल्याचे पुढील कामकाज २९ एप्रिलला होईल असे सांगितले.

  दरम्यान, श्रद्धाच्या वडिलांनी तिच्या मृतदेहाचा उर्वरित भाग अंतिम संस्कारांसाठी ताब्यात मिळावा यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला. या अर्जावरील पुढील सुनावणीच्या वेळी दिल्ली पोलीस उत्तर देतील, अशी माहिती विशेष सरकारी वकील अमित प्रसाद यांनी दिली.