इजिप्तच्या मध्यस्थीने सुरू असलेल्या शांतता चर्चेला प्रतिसाद देत इस्रायल आणि पॅलेस्टाइनमधील हमास या दोघांनीही शस्त्रसंधी करण्याची तयारी दर्शविली आहे.
गाझापट्टीतील शस्त्रसंधीची अंमलबजावणी आंतरराष्ट्रीय प्रमाणवेळेनुसार गुरुवारी सुरू झाली असल्याची माहिती इजिप्तचे परराष्ट्रमंत्री मोहमद कामेल अम्र यांनी दिली. तसेच ही तयारी दाखविल्याबद्दल त्यांनी उभयपक्षांचे आभार मानले.इस्रायलने शस्त्रसंधी स्वीकारली असल्याची माहिती पंतप्रधान नेत्यानाहू यांनी दिली.