सिंगापूरमध्ये भ्रष्टाचारप्रकरणात केंद्रीय वाहतूक मंत्र्याला अटक करण्यात आली. या मंत्र्यासह एका कोट्याधीश हॉटेल उद्योजकावरही कारवाई करण्यात आली. सिंगापूरच्या भ्रष्टाचार विरोधी पथकाने चौकशीनंतर ही कारवाई केली. एस. इस्वरन असं या मंत्र्याचं नाव आहे. अटकेनंतर आरोपी मंत्र्याला लगेचच जामिनावर सोडून देण्यात आलं.

सिंगापूरमध्ये भ्रष्टाचारविरोधी तपास पथकाने (सीपीआयबी) शुक्रवारी (१४ जुलै) एक निवेदन जारी करत याप्रकरणाची माहिती दिली. तसेच या प्रकरणात ही पहिली अटक असल्याचंही नमूद केलं. यानुसार, केंद्रीय मंत्री इस्वरन यांना आणि हॉटेल क्षेत्रातील उद्योजक आणि सिंगापूरच्या सर्वाधिक श्रीमंतांपैकी एक ओंग बेंग सेंग यांना एकाच दिवशी अटक करण्यात आलं. तसेच नंतर जामिनावर सोडून देण्यात आलं.

Narendra Modi, Pune, Road Show,
पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जाहीर सभेबरोबरच ‘रोड शो’
Narendra Modi, Pune, Road Show,
पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जाहीर सभेबरोबरच ‘रोड शो’
Trinamool Congress MPs protesting in front of the Central Election Commission headquarters protested at the police station
तृणमूलचे ‘राजकीय नाटय़’; केंद्रीय तपास यंत्रणांविरोधात पोलीस ठाण्यात २४ तास ठिय्या आंदोलन
On the occasion of Prime Minister Narendra Modi visit to Kanhan Nagpur police force on high alert mode Nagpur
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दौरा: नागपूर पोलीस ‘हाय अलर्ट मोड’वर; वाहतुक बदल जाणून घ्या…

सिंगापूरमधील कारवाईची जगभरात चर्चा

जगातील सर्वात कमी भ्रष्टाचार असणाऱ्या दैशांमध्ये समावेश असणाऱ्या सिंगापूरमध्ये झालेल्या या कारवाईची जगभरात चर्चा आहे. सिंगापूरमध्ये केंद्रीय मंत्र्यांनी भ्रष्टाचार करू नये म्हणून त्यांना खासगी क्षेत्रातील वरिष्ठ पदांवरील व्यक्तींना दिला जातो इतका पगार दिला जातो. असं असूनही केंद्रीय मंत्री भ्रष्टाचारात सापडल्याने खळबळ उडाली आहे. सिंगापूरची तपास संस्था सीपीआयबीने या प्रकरणाची सविस्तर माहिती देण्यास नकार दिला.

हेही वाचा : सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांमध्ये भ्रष्टाचार; काही ठरावीक आमदारांना बदल्यांचे अधिकार; अजित पवार यांचा आरोप

आरोपींचे पासपोर्ट सीपीआयबीच्या ताब्यात

या कारवाईनंतर दोघांचेही पासपोर्ट सीपीआयबीने ताब्यात घेतले. ओंग यांच्या विनंतीनंतर जामीन रक्कम वाढवून त्यांना बाहेर देशात जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. तेथून आल्यावर ओंग यांना आपला पासपोर्ट पुन्हा एकदा सीपीआयबीकडे जमा करावा लागणार आहे.