भारताचे पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांनी अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांची भेट घेऊन दहशतवादाबद्दलच्या भावना व चिंता त्यांच्यापर्यंत पोहचविल्या परंतु, ते तक्रार स्वरूपात नव्हते असे परराष्ट्र मंत्री सलमान खुर्शिद यांनी स्पष्ट केले आहे.
पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी ओबामांसमोर पाकिस्तानचा मुद्दा उपस्थित केल्याने नवाझ शरीफ नाखुश असल्याचे वृत्त पाकिस्तानी माध्यमांनी दिले असल्याचे विचारले असता खुर्शिद म्हणाले, “नाही, नाही. ती तक्रार नव्हती. आपण त्याकडे तक्रार म्हणून पहावे असे मला वाटत नाही. याचा आपण ते नीट समजून घेतले पाहिजे. भारत आणि अमेरिकेचे चांगले संबंध आहेत. त्यामुळे पंतप्रधान ओबामांशी बोलताना मनमोकळेपणाने बोलतात. यात तक्रारिचा मुद्दा उपस्थित होत नाही”
संग्रहित लेख, दिनांक 30th Sep 2013 रोजी प्रकाशित
‘पंतप्रधानांनी ओबामांजवळ पाकची तक्रार केली नाही’
बराक ओबामा यांची भेट घेऊन दहशतवादाबद्दलच्या भावना व चिंता त्यांच्यापर्यंत पोहचविल्या परंतु, ते तक्रार स्वरूपात नव्हते

First published on: 30-09-2013 at 02:15 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Singh did not complain to obama on pakistan khurshid