Single Use Plastic Ban Item List केंद्र सरकारने १ जुलैपासून देशात एकल वापर प्लास्टिक (single use plastic) वर बंदी घातली आहे. एकल वापर प्लास्टिक म्हणजेच प्लास्टिकपासून बनवलेल्या वस्तू, ज्या आपण एकदाच वापरतो, त्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात येत आहे. बंदी घातलेल्या उत्पादनाची निर्मिती किंवा विक्री केल्यास पर्यावरण कायदा कलम १५ अंतर्गत ७ वर्षांचा तुरुंगवास आणि १ लाख रुपयांपर्यंतचा दंड ठोठावला जाऊ शकतो.

कोणकोणत्या वस्तूंवर बंदी

प्लास्टिक कॅरी बॅग, पॉलिथीन (७५ मायक्रोनपेक्षा कमी जाडीच्या) ,प्लास्टिक स्टिक असणारे ईअर बड्स, फुग्यांसाठी वापरली जाणारी प्लास्टिक स्टिक, प्लास्टिकचे झेंडे, कँडी स्टिक, आयसक्रीम स्टिक, थर्माकोल (पॉलिस्ट्रिन), प्लास्टिकच्या प्लेट, प्लास्टिकचे कप, प्लास्टिकचे ग्लास, चमचे, चाकू, स्ट्रॉ, ट्रे, मिठाईच्या डब्ब्यांना लावण्यात येणारा प्लास्टिकचा कागद, इन्विटेशन कार्ड, सिगरेटचं पॅकेट, १०० मायक्रॉनहून कमी प्लास्टिक किंवा पीवीसी बँनर, स्टिरर (साखर किंवा इतर धान्य मिळणाऱ्या गोष्टी) या वस्तूंवरही बंदी घालण्यात आली आहे.

हेही वाचा- संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला १८ जुलैपासून सुरुवात; अग्निपथ योजनेवरुन गदारोळ होण्याची शक्यता

एकल वापर प्लास्टिकवर बंदी आणणे का आहे गरजेचे?
देशात प्रदूषण पसरवण्यामागे एकल वापर प्लास्टिक हे सर्वात मोठे कारण आहे. केंद्र सरकारच्या म्हणण्यानुसार, देशात २०१८-१९ मध्ये ३०.५९ लाख टन पेक्षा जास्त एकल वापर प्लास्टिक कचरा निर्माण झाला आणि २०१९-२० मध्ये ३४ लाख टन. एकेरी वापरल्या जाणार्‍या प्लॅस्टिकपासून बनवलेल्या वस्तूंची पुन:निर्मिती केली जात नाही किंवा त्या जाळल्या जाऊ शकत नाहीत, कारण जळताना त्यातून हानिकारक वायू बाहेर पडतात. अशा परिस्थितीत, पुनर्वापर करण्याशिवाय साठवणूक हा एकमेव मार्ग आहे.

हेही वाचा – LPG Cylinder Price महागाईत दिलासा; एलपीजी सिलेंडरच्या दरात मोठी घट, जाणून घ्या नवे दर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एकल वापर प्लास्टिकला पर्याय काय?
जेव्हा एकाच वापराच्या प्लास्टिकवर बंदी घातली जाते तेव्हा वेगवेगळ्या गोष्टींसाठी वेगवेगळे पर्याय असू शकतात. उदाहरणार्थ, प्लॅस्टिकच्या पेंढ्यांऐवजी कागदी स्ट्रॉ. त्याचप्रमाणे बांबूपासून बनवलेल्या इअर बड्स, बांबूपासून बनवलेल्या आईस्क्रीमच्या काड्या, कागद आणि कापडापासून बनवलेले ध्वज, पारंपरिक मातीची भांडी इत्यादींचा वापर एकेरी वापरल्या जाणार्‍या प्लास्टिकऐवजी करता येईल.