अमेरिकेतील फेडेक्स कंपनीच्या आवारात अज्ञात व्यक्तीने केलेल्या गोळीबारात सहा जण गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी घडली
अटलांटापासून ४० किमी अंतरावर असणाऱ्या केन्नेसो शहरातील फेडेक्सच्या गोदामात पहाटे सहाच्या सुमारास गोळीबार झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर तातडीने कंपनीचा परिसर रिकामा करण्यात आला आणि पोलिसांनी हल्लेखोराचा तपास सुरू केला. या वेळी गोळ्या लागल्यामुळे अनेकजण जखमी अवस्थेत आढळून आले. जखमी झालेल्या सहा जणांना तातडीने जवळच्या रुग्णालयात हलविण्यात आल्याचे पोलीस अधिकारी माइक बोमन यांनी सांगितले.
या प्रकरणी अनेक यंत्रणा आम्हाला मदत करीत असून विस्तृत चौकशी सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
या घटनेचा फेडेक्सने निषेध केला आहे. आमच्या कर्मचाऱ्यांची सुरक्षितता प्रथम असून आम्ही प्रशासनाशी संपूर्ण सहकार्य करीत असल्याचेही फेडेक्सच्या वतीने सांगण्यात आले.
संग्रहित लेख, दिनांक 30th Apr 2014 रोजी प्रकाशित
अमेरिकेत गोळीबारात सहा जखमी
अमेरिकेतील फेडेक्स कंपनीच्या आवारात अज्ञात व्यक्तीने केलेल्या गोळीबारात सहा जण गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी घडली
First published on: 30-04-2014 at 12:28 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Six people injured by firing in america