मानवी त्वचेवर नैसर्गिकरीत्या तयार होणाऱ्या एका विशिष्ट रसायनामुळे मानवी शरीर डासांसारख्या रक्तशोषक कीटकांना ‘अदृश्यमान’ होऊन आपला बचाव होतो़ डासांची वासावरून लक्ष्य ठरविण्याच्या क्षमतेला या रसायनाने प्रतिबंध केला जातो, असे नवे संशोधनात आढळून आले आह़े
‘अमेरिका केमिकल सोसायटी’च्या बैठकीत संशोधकांनी डासांची गंधाद्वारे लक्ष्य करण्याची क्षमता नष्ट करणारे संयुग असल्याचा दावा केला़ डासांना प्रतिबंध करण्यासाठी डासांसाठी तिरस्कार्ह गंधाचा वापर करण्याची पद्घत जुनी आह़े ‘डीट’ नावाचे तिरस्कार्ह गंधाचे रसायन सर्वाधिक प्रमाणात वापरले जात़े परंतु, त्याचा गंध काही लोकांना आवडत नाही, असेही या वेळी अमेरिकेच्या कृषी विभागाचे संशोधक उल्रिच बेर्निअर यांनी सांगितल़े
डासांच्या गंधाच्या क्षमतेत गोंधळ उडवून देण्यासाठी नवी पद्घत आम्ही शोधत आहोत़ डासांना त्याचे अन्न तयार आहे हेच कळले नाही, तर ते जमिनीवर उतरणार नाहीत़ आणि डंखही करू शकणार नाही़ मादी डास १०० फूट लांबूनच मानवी गंधाचा माग काढू शकतात़
अमेरिकेतील कृषी विभागातील डास आणि उडते कीटक विभाग आणि गेनव्हिला येथील वेटरिनरी इटोमोलॉजी विभागात १९४० सालापासून डासांना थोपविण्याच्या विविध उपायांवर संशोधन करीत आह़े
संशोधकांनी डासांची गंधाद्वारे लक्ष्य करण्याची क्षमता नष्ट करणारे संयुग असल्याचा दावा केला़ डासांना प्रतिबंध करण्यासाठी डासांसाठी तिरस्कार्ह गंधाचा वापर करण्याची पद्घत जुनी आह़े
संग्रहित लेख, दिनांक 11th Sep 2013 रोजी प्रकाशित
त्वचेवरील विशिष्ट रसायनामुळे डासांपासून बचाव
मानवी त्वचेवर नैसर्गिकरीत्या तयार होणाऱ्या एका विशिष्ट रसायनामुळे मानवी शरीर डासांसारख्या रक्तशोषक कीटकांना ‘अदृश्यमान’ होऊन आपला बचाव होतो़

First published on: 11-09-2013 at 12:15 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Skin protection from mosquitoes due to specific chemical