उत्तर प्रदेशात भाजपची सत्ता आल्यानंतर अवैध कत्तलखान्यांवर घालण्यात आलेल्या बंदीचा मुद्दा सध्या देशभरात गाजत आहे. योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होताच पोलिसांनी राज्यातील बेकायदा कत्तलखान्यांवर कारवाईचा सपाटा लावला आहे. पोलिसांनी आतापर्यंत केलेल्या धडक कारवाईत अनेक बेकायदा कत्तलखान्यांना टाळे ठोकले आहे. या पार्श्वभूमीवर आता देशातील धार्मिक राजकारण तापण्यास सुरूवात झाली आहे. कत्तलखाने बंद झाल्यामुळे अनेकांच्या रोजगारांवर आलेली गदा आणि या व्यवसायात विशिष्ट धर्माचेच लोक काम करतात का, हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. साधारणपणे गोमांस निर्यात करणारा समूह विशिष्ट धर्माशी संबंधित असतो, असा समज आहे. मात्र, यासंबंधी नुकतीच एक आश्चर्यकारक माहिती समोर आली आहे. ‘बीबीसी’ने दिलेल्या वृत्तानुसार भारतामध्ये गोमांसाची निर्यात करणारे सर्वात १० मोठे निर्यातदार हे हिंदूधर्मीय आहेत. केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाचा भाग असलेल्या शेती व प्रक्रिया खाद्य उत्पादन निर्यात प्राधिकरणाने ही माहिती प्रसिद्ध केली आहे. यामध्ये देशातील ७४ कत्तलखान्यांपैकी १० सर्वात मोठ्या कत्तलखान्यांचे मालक हिंदू असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अल कबीर
अल कबीर हा देशातील सर्वात मोठा कत्तलखाना तेलंगणाच्या मेडक जिल्ह्यात आहे. सतीश सब्बरवाल हे या तब्बल ४०० एकरांच्या परिसरात पसरलेल्या कत्तलखान्याचे मालक आहेत. मुंबईच्या नरिमन पॉईंट परिसरात अल कबीरचे मुख्यालय असून या कत्तलखान्यातून अनेक आखाती देशांमध्ये गोमांसाची निर्यात केली जाते. दुबई, अबुधाबी, जेद्दा, कुवेत, मदीना , रियाद, खरमिश, सित्रा, मस्कत आणि दोहा या आखाती देशांमध्येही अल कबीरची कार्यालये आहेत. अल कबीरचे मालक सतीश सब्बरवाल यांनी धर्म आणि व्यवसाय या दोन्ही गोष्टी पूर्णपणे भिन्न असल्याचे म्हटले आहे. या दोन्हींची गल्लत करता कामा नये, असे मत सब्बरवाल यांनी मांडले. अल कबीरने गेल्या आर्थिक वर्षात ६५० कोटींचा व्यवसाय केला होता.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Slaughterhouse in up yogi adityanath 10 major meat slaughterhouses of india owned by hindu
First published on: 28-03-2017 at 12:45 IST