स्मृती इराणींचा पाठलाग केल्याप्रकरणी ४ जणांविरोधात आरोपपत्र दाखल

दिल्लीच्या चाणक्यपुरी परिसरात स्मृती इराणी यांच्या सरकारी गाडीचा पाठलाग केल्याप्रकरणी पोलिसांनी ४ जणांना अटक केली होती.

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचा पाठलाग केल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी ४ युवकांविरोधात आरोपपत्र दाखल केलं आहे. गेल्या वर्षी झालेल्या या घटनेची माहिती स्वतः इराणी यांनी १०० नंबरवर फोन करुन पोलिसांना दिली होती.

गेल्या वर्षी दिल्लीच्या चाणक्यपुरी परिसरात स्मृती इराणी यांच्या सरकारी गाडीचा पाठलाग केल्याप्रकरणी पोलिसांनी ४ जणांना अटक केली होती. नंतर त्यांना जामीन मंजुर झाला होता. त्या चौघांविरोधात एप्रिल महिन्यात कलम ३५४ डी आणि कलम ५०९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

टीव्ही जगतातून राजकारणात आलेल्या इराणी अनेकदा त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असतात. २०१४ मध्ये मोदी सरकारमध्ये त्या मानव संसाधन विकास मंत्री होत्या. नंतर त्यांना कपडा मंत्रालय देण्यात आलं, सध्या त्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचा कार्यभार देखील सांभाळत आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Smriti irani stalking case chargesheet against four youth