काँग्रेस कार्यसमितीची सोमवारी झालेली बैठक वादळी ठरली. तब्बल सात तास चाललेल्या या बैठकीत काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना पत्र पाठवणाऱ्या नेत्यांना सुनावण्यात आले. खासकरुन राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांना लक्ष्य करण्यात आले. दरम्यान आता सोनिया गांधी आणि राहुल गांधी दोघांनी गुलाम नबी आझाद यांच्याबरोबर चर्चा केल्याची माहिती आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काँग्रेस कार्यसमितीची बैठक संपल्यानंतर सोनिया गांधी यांनी गुलाम नबी आझाद यांच्याबरोबर फोनवरुन चर्चा केली. पत्र पाठवण्याच्या वेळेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या राहुल गांधी यांनी सुद्धा मंगळवारी आझाद यांच्याबरोबर चर्चा केल्याची माहिती आहे.

आणखी वाचा- ‘या’ काँग्रेस नेत्याच्या घरी डिनरदरम्यान झाली हायकमांडला पत्र पाठवण्याची प्लॅनिंग

पक्ष नेतृत्वाच्या मुद्यावर वेगळी मते असलेल्या या २३ काँग्रेस नेत्यांनी सोनिया गांधी यांना पत्र पाठवून पक्षनेतृत्वाचा प्रश्न तातडीने सोडवण्याची मागणी केली होती. पक्षामध्ये काही मुद्यांवर वेगळे विचार ठेवणाऱ्या या २३ नेत्यांवर हे पत्र भाजपाला पूरक असल्याचा आरोप काँग्रेस सदस्यांनी केला. त्या पत्रावर स्वाक्षरी असलेल्या नेत्यांनी हा आरोप फेटाळून लावला.

आणखी वाचा- काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडीवर चिदंबरम यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले…

बैठकीच्या समारोपात बोलताना सोनिया गांधी यांनी पत्रावरून आणि झालेल्या आरोप प्रत्यारोपावरून नाराजी व्यक्त केली. “आपल्या पत्र लिहिणाऱ्या नेत्यांना विरोधी ठरवलेलं नाही. आपण दुखावलो गेलो आहे, पण सगळे माझे सहकारीच आहे. झाले गेलं सोडून द्या. आता पुन्हा एकदा नव्यानं एकजुटीनं कामाला सुरूवात करू,” अशा भावना सोनिया गांधी यांनी बैठकीत व्यक्त केल्या.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sonia rahul spoke to azad after cwc meeting dmp
First published on: 26-08-2020 at 08:15 IST