रशियन अंतराळ संस्था रॉसकोमोसच्या प्रमुखांनी युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकने लादलेल्या निर्बंधांचा परिणाम आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनसंदर्भातील कामांवर होऊ शकतो असं म्हटलंय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी रशियावर लादलेल्या नव्या निर्बंधांचा परिणाम आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन रशिया करत असलेलं सहकार्य काढून घेण्यापर्यंत जाऊ शकतो असं रशियन अधिकाऱ्यांनी सांगितलंय. सध्या आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनवर चार अमेरिकन, दोन रशियन आणि एक जर्मन अंतराळवीर वास्तव्यास आहेत.

नक्की पाहा >> Photos: व्लादिमिर Vs वोलोडिमिर! युक्रेन युद्धात पुतिन यांना नडणारा ‘स्टॅण्डअप कॉमेडियन’

रॉसकोमोसचे प्रमुख दिमित्रि रोगोजिन यांनी ट्विटरवरुन यासंदर्भात इशारा देताना भारताचही उल्लेख केलाय. “जर तुम्ही आमच्यासोबतच्या सहकार्यावर निर्बंध आणले तर आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनला वाटेल त्या भ्रमणकक्षेत फिरण्यापासून कोण वाचवणार. ते अमेरिका किंवा युरोपमध्ये पडणार नाही का?”, असा प्रश्न दिमित्रि रोगोजिन यांनी उपस्थित केलाय. अमेरिकने निर्बंध लादल्यानंतर लगेच दिमित्रि रोगोजिन यांनी हे ट्विट केलेलं.

“त्याचप्रमाणे ५०० टन (५ लाख किलो) वजनाची ही वस्तू भारत किंवा चीनवर पाडण्याचाही पर्याय आहे. तुम्हाला या शक्यतेने त्यांना धमकवायचे आहे का? आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन रशियावरुन जात नाही, त्यामुळे सर्व धोका तुम्हालाच आहे. तुम्ही त्यासाठी तयार आहात का?,” असंही दिमित्रि रोगोजिन यांनी विचारलं आहे.

नक्की वाचा >> Ukraine War: रशिया दौऱ्यात इम्रान खान यांच्या कुरापती; युक्रेनवर हल्ला करणाऱ्या पुतिन यांना म्हणाले, “काश्मीर प्रश्न…”

त्यानंतर दिमित्रि रोगोजिन यांनी अमेरिकेला एक मैत्रीपूर्ण सल्ला देताना अशाप्रकारे बेजबाबदारपणे वागू नये असं म्हटलंय. अमेरिकने जारी केलेल्या नव्या निर्बंधांमध्ये माहिती तंत्रज्ञानासंदर्भातील निर्यात कमी करण्याचं ठरवण्यात आलंय. यामुळे रशियाला लष्करी आणि अंतराळ क्षेत्रामध्ये काम करण्यास अडचणी निर्माण होतील असं अंदाज बायडेन यांनी व्यक्त केलाय.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नक्की वाचा >> Russia vs Ukraine War: रात्री उशीरा पंतप्रधान मोदींचा पुतिन यांना फोन; फोनवर म्हणाले, “रशियाचे…”

अमेरिकेने रशियन सत्ताधाऱ्यांच्या निकटवर्तीयांवर तसेच रशियन बँकांवर निर्बंध आणलेत. दरम्यान अमेरिकन अंतराळ संस्था म्हणजेच नासाने नवीन निर्बंधांमुळे अमेरिका आणि रशिया स्पेस स्टेशनसंदर्भात करत असणाऱ्या कामावर कोणताही परिणाम होणार नसल्याचं म्हटलंय.