तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता लाचप्रकरणी दोषी ठरल्याने श्रीरंगम विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होणार असून द्रमुकने त्यासाठी आपला उमेदवार जाहीर केला आहे. या पोटनिवडणुकीमुळे सत्तारूढ अभाअद्रमुकच्या कामगिरीचा निकाल लागणार असून विरोधी पक्षालाही आपली कुवत कळणार आहे. भाजपनेही ही पोटनिवडणूक लढण्याचा निर्णय घेतल्याने या मतदारसंघात तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे.
येत्या १३ फेब्रुवारी रोजी पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार असून द्रमुकने एन. आनंद यांची उमेदवारी जाहीर केली आहे. आनंद यांनी २०११ मध्ये जयललिता यांच्याविरुद्ध निवडणूक लढविली होती आणि ते पराभूत झाले होते.
गेल्या निवडणुकीत द्रमुकचा पराभव केल्यानंतर अभाअद्रमुकने सर्व पोटनिवडणुकांमध्ये विजय मिळविला आहे. इतकेच नव्हे तर गेल्या लोकसभा निवडणुकीतही पक्षाने कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या द्रमुकचा दारुण पराभव केला आहे. कर्नाटक उच्च न्यायालयात जयललिता कायदेशीर लढाई लढत असल्याने या पोटनिवडणुकीकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 14th Jan 2015 रोजी प्रकाशित
जयललिता यांच्या श्रीरंगम मतदारसंघात तिरंगी लढत
तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता लाचप्रकरणी दोषी ठरल्याने श्रीरंगम विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होणार असून द्रमुकने त्यासाठी आपला उमेदवार जाहीर केला आहे.
First published on: 14-01-2015 at 12:35 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Srirangam constituency by election on february