आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि टीडीपी नेते चंद्राबाबू नायडू यांच्या रोड शोदरम्यान चेंगराचेंगरी झाली आहे. या दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत. नेल्लोर जिल्ह्यातील कंदुकुरू येथे चंद्रबाबू नायडू यांच्या जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यानंतर काढलेल्या ‘रोड शो’दरम्यान ही घटना घडली आहे.

बुधवारी संध्याकाळी नायडू यांनी आपल्या वाहनातून ‘रोड शो’ करायला सुरुवात केली. यावेळी हजारो लोकांची प्रचंड गर्दी जमली होती. नायडू यांचा रोड शो सुरू असताना लोकांमध्ये आफरातफर सुरू झाली. यावेळी चेंगराचेंगरी झाल्यानंतर अनेक लोक पाण्याच्या कॅनॉलमध्ये पडले. यामध्ये सात जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर अनेकजण जखमी झाले. सर्व जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

आंध्र प्रदेशातील चेंगराचेंगरीचा व्हिडीओ:

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या घटनेनंतर चंद्राबाबू नायडू यांनी आपला ‘रोड शो’ तत्काळ थांबवला आणि मृतांच्या नातेवाईकांना १० लाख रुपयांची मदत जाहीर केली. तसेच जखमींवर चांगले उपचार व्हावेत, यासाठी आपल्या पक्षातील नेत्यांना सूचना दिल्या.