Premium

VIDEO : गुजरातमध्ये रामनवमी उत्सवाला गालबोट, शोभायात्रेवर दगडफेक; वडोदऱ्यात तणावपूर्ण शांतता

गुजरातच्या वडोदरा येथील भुतलीझापा परिसरात रामनवमीनिमित्त निघालेल्या शोभायात्रेवर काही समाजकंटकांकडून दगडफेक करण्यात आली आहे.

Stone pelting at Ramanavami Shoba Yatra in gujarat
फोटो – एएनआय वृत्तसंस्था

गुजरातच्या वडोदरा येथील भुतलीझापा परिसरात रामनवमीनिमित्त निघालेल्या शोभायात्रेवर काही समाजकंटकांकडून दगडफेक करण्यात आली आहे. यामुळे संपूर्ण परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. घटनेचं गांभीर्य लक्षात घेत प्रशासनाकडून संपूर्ण परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. महत्त्वाचं म्हणजे गेल्या वर्षीही रामनवमीच्या दिवशी या भागात अशाच प्रकारे शोभायात्रेवर दगडफेक करण्यात आली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – Indore temple tragedy : बेलेश्वर मंदिरात रामनवमी उत्सव सुरू असताना कोसळलं विहिरीचं छत, २५ भाविक अडकल्याची भीती

एनएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, वडोदराच्या भुतलीझापा परिसरात रामनवमीनिमित्त शोभायात्रा काढण्यात आली होती. ही शोभायात्रा मशिदीसमोरून जात असताना अचानक दगडफेक सुरू झाली. या दगडफेकीत कोणालाही इजा झाली नसून परिसरातील चारचाकी गाड्यांचं मोठं नुकसान झालं आहे. या घटनेची माहिती मिळताच वडोदरा पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, या भागात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून परिस्थिती नियंत्रणात आहे. तसेच या भागात तणावपूर्ण शांतता बघायला मिळत आहे. याबरोबरच आरोपींची ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत असल्याची माहिती आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Stone pelting at ramanavami shoba yatra in vadodara gujarat situation is under control spb

First published on: 30-03-2023 at 16:37 IST
Next Story
Viral Video : शेतकऱ्याची पंतप्रधान मोदींच्या फोटोसोबत ‘मन की बात’, फोटोचा मुका घेत निरागसपणे म्हणाला…