भाजपातील ज्येष्ठ नेते जे.पी. नड्डा यांची सोमवारी भाजपाच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. नड्डा यांचे भाजपाच्या विजयात मोलाचे योगदान होतं. उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला मिळालेल्या यशातही त्यांनी मोठं योगदान दिलं आहे. १९८६ पासून नड्डा राजकारांमध्ये सक्रिय आहेत. सुरुवातीला अभाविपचे राष्ट्रीय सचिव म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. नड्डा यांनी वयाच्या वयाच्या ३३ व्या वर्षी आमदार म्हणून निवडून आले होते. जे. पी नड्डा यांना अमित शाह यांचे विश्वासू म्हणून ओळखलं जाते. शिवाय ते रा. स्व. संघाचे कट्टर स्वयंसेवकही आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जे. पी. नड्डा हे मागील मंत्रिमंडळात समाविष्ट होते. कमीत कमी प्रकाशझोतात राहून वेगाने कामं करून घेण्याचं कौशल्य नड्डा यांच्यात आहे. आयुष्मान भारत, मोदी केअर या योजना आणण्यात त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता. अमित शाह यांचे ते निकटवर्तीय मानले जातात. उत्तर प्रदेशात मतांची टक्केवारी ५० टक्के यावी अशी अपेक्षा अमित शाह यांनी नड्डा यांच्याकडून केली होती. नड्डा यांनी ४९.६ टक्के टक्केवारी आणून दाखवली. जगत प्रकाश नड्डा यांचा जन्म पाटणा या ठिकाणी एका ब्राह्मण कुटुंबात झाला. पाटणा येथील सेंट झेवियर्स विद्यापीठातून त्यांनी शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर हिमाचल प्रदेशातून त्यांनी LLB ची डिग्री घेतली. विद्यार्थीदशेत असताना जयप्रकाश नारायण यांच्या चळवळीतही नड्डा यांनी सहभाग नोंदवला होता. हिमाचल प्रदेशात शिक्षण घेताना ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सदस्य झाले. १९८४ मध्ये स्टुंडट्स फेडरेशन ऑफ इंडियाचा पराभव अभाविपने केला होता. ज्यानंतर हिमाचल प्रदेशात पहिल्यांदा विद्यार्थी युनियनचे अध्यक्षपद जे. पी नड्डा यांनी भुषवलं.

१९८६ ते १९८९ या कालावधीत जे. पी. नड्डा हे अभाविपचे राष्ट्रीय सचिव होते. त्यानंतर भारतीय युवा मोर्चा अर्थात भाजयुमोच्या अध्यक्षपदीही त्यांची नियुक्ती करण्यात आली. वयाच्या ३३ व्या वर्षी त्यांनी हिमाचलमधून आमदारकीची निवडणूक लढवली आणि जिंकून आले. त्यानंतर १९९८ आणि २००७ या दोन्ही वर्षातही त्यांनी आमदारकीची निवडणूक लढवली आणि जिंकली. या सगळ्या प्रवासानंतर नितीन गडकरी यांच्यामुळे जे. पी. नड्डा यांचा प्रवेश भाजपाच्या राष्ट्रीय राजकारणात झाला. २०१२ मध्ये त्यांनी राज्यसभा लढवली. त्यानंतर ते अमित शाह यांचे विश्वासू सहकारी झाले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Story know who is the bjp executive president jp nadda nck
First published on: 17-06-2019 at 20:49 IST