पीटीआय, तिरुवनंतपुरम

केरळमध्ये शनिवारी डाव्या विद्यार्थी संघटनांनी राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांच्याविरुद्ध निदर्शने केल्यानंतर त्यांनी रस्त्यावर दोन तास बसकण मारली आणि मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांच्यावर ‘अराजकतेला पाठिंबा देत असल्याचा’ आरोप केला. यानंतर केंद्राने राज्यपालांची सुरक्षा वाढवून ती ‘झेड प्लस’ दर्जाची केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एका कार्यक्रमासाठी कोट्टारकारा येथे जाताना राज्यपालांना कोल्लममधील नीलामेल येथे माकपशी संलग्न स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) संघटनेच्या विद्यार्थ्यांनी काळे झेंडे दाखवले. यामुळे चिडून ते मोटारीतून उतरले आणि आंदोलकांविरुद्ध पोलीस कारवाईच्या मागणीसाठी त्यांनी रस्त्यावरच ठाण मांडले.