वाराणसी न्यायालयाने बुधवारी (३१ जानेवारी) हिंदू भाविकांना ज्ञानवापी मशिदीच्या तळघरात प्रार्थना आणि पूजा करण्याचा अधिकार बहाल केला आहे. न्यायालयाच्या निर्देशानुसार हिंदू भाविक मशीद परिसरात ‘व्यासाचे तळघर’ (व्यास का तेखाना) येथे जाऊन पूजा करू शकतात. मशिदीतील हा भाग गेल्या अनेक वर्षांपासून बंद ठेवला होता. जिल्हा प्रशासनाने पुढील सात दिवसांत हिंदूंना त्या ठिकाणी पूजा करण्याची व्यवस्था करून द्यावी, असे निर्देश न्यायालयाने दिले होते. त्यानुसार आज (१ फेब्रुवारी) वाराणसीतल्या ज्ञानवापी परिसरातल्या व्यासजी तळघरात अखेर ३१ वर्षांनी पूजा करण्यात आली. आज सकाळीच अनेक लोक या ठिकाणी पूजा करण्यासाठी पोहचले होते. ज्ञानवापी परिसरात असलेल्या व्यास तळघरात पहाटे दोन वाजता पूजा आणि आरती करण्यात आली. ३० वर्षांनी ही घटना घडली आहे. आम्ही केवळ न्यायालयाच्या आदेशाचं पालन केल्याचं भक्तांचं म्हणणं आहे. त्याचबरोबर न्यायालयाच्या आदेशानंतर पोलिसांनी या परिसरात लावलेले बॅरिगेट्सही हटवण्यात आले आहेत.

अयोध्येपाठोपाठ हिंदू संघटनांनी आता ज्ञानवापी मशिदीच्या जागी मंदिर बांधलं जावं यासाठीचा न्यायालयीन लढा तीव्र केला आहे. अशातच आता बाबरी मशिदीप्रमाणे ज्ञानवापी मशीद पाडून त्या ठिकाणी मंदिर बांधलं जावं, अशी मागणी हिंदू संघटनांनी केली आहे.

thane lok sabha marathi news, thane bjp sanjay kelkar marathi news
ठाण्यात भाजपच्या जुन्या-नव्यांमध्ये रस्सीखेच
Conspiracy of sugar mills owners against me Raju Shettys allegation
माझ्या विरोधात साखर कारखानदारांचे षडयंत्र; राजू शेट्टी यांचा आरोप
Arvind kejriwal
केजरीवाल तिहार जेलमध्ये रामायणासह पंतप्रधानांबाबतचं ‘हे’ पुस्तक वाचणार, न्यायालयाकडे ‘या’ वस्तूंसाठी परवानगी अर्ज
ठाण्यासाठी शिंदे गटाच्या जोर-बैठका; मतदारसंघात उमेदवारीसाठी कार्यकर्ते आग्रही ; भाजपाला जागा जाण्याच्या चर्चेने अस्वस्थता

ज्ञानवापी मशीद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लोकसभा मतदारसंघ असलेल्या वाराणसीत आहे. त्यामुळे मोदी यांनी हिंदू संघटनांच्या लढ्याला बळ द्यावं, अशी मागणी हिंदू संघटनांनी केली आहे. अशातच ज्येष्ठ भाजपा नेते आणि माजी खासदार सुब्रह्मण्यम स्वामी यांनी नरेंद्र मोदी यांच्याकडे एक मागणी केली आहे. तसेच ती मागणी पूर्ण न झाल्यास मोदींविरोधात त्यांच्याच मतदारसंघात मोहीम सुरू होईल, असा इशाराही स्वामी यांनी दिला आहे.

सुब्रह्मण्यम स्वामी यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्ञानवापी क्षेत्राच्या मुक्तीसाठी, मूळ काशी विश्वनाथ मंदिराच्या पुनर्बांधणीसाठी आणि मशिदीसाठी पर्यायी जमीन देण्यासाठी सक्रीय पाठिंबा दर्शवला तर बरं होईल, अन्यथा २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत वाराणसी मतदारसंघात त्यांचा पराभव करण्याची मोहीम सुरू होईल.

हे ही वाचा >> ज्ञानवापीच्या ‘व्यासजी तळघरा’त ३१ वर्षांनी पूजा आणि आरती, आयुक्तांचीही उपस्थिती

मुस्लीम पक्षकार वरिष्ठ न्यायालयात दाद मागणार

एका बाजूला न्यायालयाच्या आदेशानंतर हिंदू समुदायाने ज्ञानवापीच्या व्यासजी तळघरात ३१ वर्षांनी पूजा आणि आरती केली आहे. तर, दुसऱ्या बाजूला, मुस्लीम पक्षकारांनी जिल्हा न्यायालयाच्या या निर्णयाला वरिष्ठ न्यायालयात आव्हान देण्याचा निर्णय घेतला आहे. तत्पूर्वी हिंदू पक्षकारांचे वकील मदन मोहन यादव यांनी पीटीआयला सांगितलं की जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश अजय कृष्ण विश्वेस यांनी हिंदूंना व्यासजी तळघरात पूजा करण्याचा अधिकार असल्याचा निर्वाळा दिला आहे. त्यानंतरच हिंदू समुदायाने इथे पूजा आणि आरती केली आहे.