खलिस्तान मुक्ती आघाडीचा अतिरेकी देविंदरपाल सिंग भुल्लर याने आपल्या फाशीचा पुनर्विचार करण्यासंबंधी सर्वोच्च न्यायालयात केलेली याचिका न्यायालयाने बुधवारी फेटाळून लावली. आपल्या दयेच्या अर्जावर निर्णय घेण्यास सरकारने विलंब लावल्यामुळे फाशीच्या शिक्षेचा पुनर्विचार करावा आणि शिक्षेचे रूपांतर जन्मठेपेच्या शिक्षेत करावे,अशी याचिका भुल्लरने सर्वोच्च न्यायालयात केली होती.
न्या.जी.एस.सिंघवी यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. भुल्लर याने सप्टेंबर १९९३ मध्ये घडवून आणलेल्या बॉम्बस्फोटात नऊजण ठार आणि २५ जण जखमी झाले होते.२००१ मध्ये भुल्लरला फाशीची शिक्षा ठोठावण्यात आल्यानंतर त्याने प्रथम उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय तसेच राष्ट्रपतींकडेही धाव घेऊन शिक्षा कमी करण्याचे प्रयत्न केले.