सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायधीश उदय लळित यांनी पदभार स्वीकारल्यानंतर न्यायालयातील पेंडीग प्रकरणं निकाली काढण्याचा सपाटा लावला आहे. त्यांनी अवघ्या १३ दिवसांत पाच हजारांच्यावर प्रकरणं निकाली काढली आहेत.

हेही वाचा – मोदी, पुतीन यांच्या बैठकीकडे लक्ष ; युक्रेनवरील हल्ल्यानंतर पहिलीच प्रत्यक्ष भेट

बार अ‍ॅंण्ड बेंच या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, सर्वोच्च न्यायालयाने गेल्या १३ दिवसांत एकूण ५११३ प्रकरणं निकाली काढली आहेत. यामध्ये २८३ नियमित, १२१२ हस्तांतरण केलेल्या तर ३६१८ अन्य प्रकरणांचा समावेश आहे. ही प्रकरणं निकाली काढण्यासाठी नवीन प्रणाली लागू करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायधीश उदय लळित या पदभार स्वीकारल्यानंतर न्यायप्रक्रियेत जे बदल केलेत त्यापैकी हा एक बदल आहे.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयात कामांच्या दिवशी नियमीत प्रकरणाच्या सुनावणी दुपारी १०.३० ते १ दरम्यान घेण्यात येत आहेत. तर अन्य दिवशी दुपारी २ ते ४ या वेळात इतर प्रकरणांच्या सुनावणी घेण्यात येत आहे.