Election Commission on Electoral Bonds Data: गेल्या महिन्याभरापासून चर्चेत असणाऱ्या निवडणूक रोख्यांचा तपशील अखेर निवडणूक आयोगाने आपल्या संकेतस्थळावर जाहीर केला आहे. या तपशीलामध्ये कुणी किती रुपयांचे निवडणूक रोखे खरेदी केले आणि कोणत्या राजकीय पक्षाला किती रुपयांचे निवडणूक रोखे मिळाले, याची माहिती जाहीर करण्यात आली आहे. मात्र, कोणत्या व्यक्तीने वा कंपनीने कोणत्या राजकीय पक्षाला किती निधी दिला, याची माहिती मात्र समोर येऊ शकली नव्हती. आता यासंदर्भात महत्त्वाचा घटक असणारा निवडणूक रोख्यांचा विशेष क्रमांक जाहीर करण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने एसबीआयला नोटीस जारी केली आहे.

एसबीआयनं दिलेली माहिती निवडणूक आयोगानं जाहीर केल्यानंतर या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका करणाऱ्या एडीआर अर्थात असोसिएशन फॉर डेमॉक्रॅटिक रिफॉर्म्स संस्थेनं सर्व निवडणूक रोख्यांचे विशेष क्रमांक जाहीर करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. या याचिकेची दखल घेत न्यायालयाने यासंदर्भात एसबीआयला विशेष क्रमांक जाहीर करण्यासंदर्भात नोटीस बजावली आहे. त्यासोबतच निवडणूक आयोगाने निवडणूक रोख्यांसंदर्भातली सर्वोच्च न्यायालयाच्या ताब्यात दिलेली सीलबंद माहिती आयोगाला पुन्हा देण्याचीही न्यायालयाने यावेळी परवानगी दिली.

supreme court on NOTA (1)
NOTAला सर्वाधिक मतं मिळाली तर कोण विजयी होतं? का पुन्हा निवडणूक होते? जाणून घ्या नकाराधिकाराचा अर्थ
modi made 20-25 billionaire but we will make millions millionaires says rahul gandhi
द्वेषपूर्ण भाषण; पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधींना निवडणूक आयोगाची नोटीस
supreme court (2)
“ईव्हीएमशी छेडछाड केल्यास काही शिक्षा आहे का?” सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला विचारणा
nitesh rane Chandrashekhar Bawankule
नितेश राणेंचा मतांसाठी सरपंचांना सज्जड दम; बावनकुळे पाठराखण करत म्हणाले, “चांगलं आहे, ते काही…”

Electoral Bonds Data: निवडणूक रोख्यांमधून हजारो कोटी दान करणारे ‘दानशूर’ कोण आहेत माहिती आहे? वाचा पहिल्या २० दात्यांची माहिती!

विशेष क्रमांकाची माहिती कुठे आहे?

SBI कडून माहिती जाहीर करण्यासाठी मुदतवाढ देण्याची विनंती न्यायालयात करण्यात आली तेव्हाच प्रत्येक निवडणूक रोख्याला देण्यात आलेल्या विशेष क्रमांकावरही युक्तिवाद झाला. कुणी कोणत्या पक्षाला किती निधी दिला, हे समजण्यासाठी हा विशेष क्रमांक (Unique ID) महत्त्वाचा दुवा आहे. सध्या एसबीआयनं जाहीर केलेली माहिती दोन प्रकारांमध्ये विभागलेली आहे. कुणी किती रकमेचे निवडणूक रोखे खरेदी केले आणि कोणत्या राजकीय पक्षाला किती रकमेचे निवडणूक रोखे मिळाले या प्रकारची वेगवेगळी माहिती सध्या एसबीआयनं जाहीर केली असून प्रत्येक निवडणूक रोख्यांना असणाऱ्या या विशेष क्रमांकाच्या मदतीने कुणी कोणत्या पक्षाला किती निधी दिला, हे स्पष्ट होऊ शकणार आहे!

एडीआरकडून सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद करणारे वरीष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या माहितीनुसार, याचिकाकर्ते लवकरच हा विशेष क्रमांक जाहीर करण्यासाठी एसबीआयला आदेश देण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयासमोर करणार आहेत. दरम्यान, या नोटीसला अद्याप एसबीआयकडून उत्तर देण्यात आलेलं नाही.

ED, IT चा दणका बसताच तीन कंपन्यांची भाजपाला भरभरून देणगी, टॉप ५ मध्ये असेलल्या या कंपन्या कोणत्या?

निवडणूक रोख्यांच्या तपशीलातून मोठी माहिती झाली उघड

दरम्यान, निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक रोखे तपशीलानुसार १ एप्रिल २०१९ ते १५ फेब्रुवारी २०२४ या काळात तब्बल २२ हजार २१७ कोटींचे निवडणूक रोखे राजकीय पक्षांच्या नावे जारी करण्यात आले आहेत. त्यापैकी ८ हजार ६३३ कोटींचे रोखे एकट्या भाजपाच्या नावावर आहेत, तर तृणमूल काँग्रेस दुसऱ्या आणि काँग्रेस तिसऱ्या स्थानावर आहे. भाजपाला मिळालेल्या रोख्यांपेकी आत्तापर्यंत भाजपानं ६ हजार ०६ कोटींचे रोखे वटवलेही आहेत. जानेवारी महिन्यातही भाजपानं २०० कोटींचे रोखे वटवले आहेत!