सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या फाशी शिक्षेच्या अंमलबजावणीला विलंब झाल्याने, फाशीच्या शिक्षेचे रुपांतर जन्मठेपेत व्हावे अशी खालिस्तान लिब्रेशन फोर्सचा दहशतवादी देवेंद्रपाल सिंग भुल्लरने केलेली याचिका आज(शुक्रवार) सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. फाशीची शिक्षा झालेल्या गुन्हेगाराच्या दया याचिकेवर निर्णय घेण्यास उशीर झाला, तरीही त्याची फाशीची शिक्षा रद्द करता येणार नाही असा महत्त्वाचा निर्णय सर्वोच्च न्यायालायने घेतला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने भुल्लरच्या कुटूंबीयांनीकेलेल्या याचिकेवरील निर्णयाला १९ एप्रिल २०१२ रोजी  दिल्लीच्या खंडपीठाने स्थगिती दिली होती.

सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर अनेक वर्षांपासून फाशीची शिक्षा सुनावलेल्या कैद्यांच्या दया याचिकांच्या निर्णयाला दिशा मिळू शकते. त्यामुळे हा निर्णय ऐतिहासिक ठरू शकतो. यात राजीव गांधी यांच्या हत्येप्रकरणी फाशीची शिक्षा सुनवलेलेले गुन्हेगार तसेच सागाची तस्करी करण्यात विरप्पनला मदत करणारे गुन्हेगार यांच्याही दया याचिका अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत.
सप्टेंबर १९९३च्या बाँबस्फोटांमागे बुल्लरचा हात होता. यास्फोटांध्ये नऊ जणांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी बुल्लरला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. बुल्लरची फाशीची शिक्षा सर्वोच्च न्यायालयाने आता कायम केलेली आहे.