इंदिरा गांधी भारताच्या सर्वात शक्तिशाली पंतप्रधान- सुरेश प्रभू

भारतात महिलांनी आपल्या कार्यकौशल्याने एका संस्कृतीची उभारणी केली आहे.

railway minister , suresh prabhu , commuters , central railway , Loksatta, Loksatta news, Marathi, Marathi news
suresh prabhu : भिवपुरी येथे सिग्नल यंत्रणेत झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे आज सकाळी ५.०५ मिनिटांची मुंबईकडे येणारी ट्रेन बदलापूर स्थानकात उशिरा पोहचली. त्यामुळे बदलापूर स्थानकात गाडीसाठी ताटकळत असलेले प्रवाशी संतप्त झाले.

इंदिरा गांधी या भारताच्या सर्वात शक्तिशाली पंतप्रधान असल्याचे विधान केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी केले. ते मंगळवारी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होते. अमेरिकेत आजपर्यंत एकही महिला राष्ट्रपती होऊ शकलेली नाही. मात्र, भारतात राष्ट्रपती, लोकसभा अध्यक्ष आणि पंतप्रधान अशी तिन्ही प्रमुख पदं महिलांनी भुषवली आहेत, असे प्रभू यांनी सांगितले. यादरम्यान, त्यांनी इंदिरा गांधी यांचा उल्लेख भारताच्या सर्वात शक्तिशाली पंतप्रधान असा केला. जगभरातील अनेक महिलांनी आपल्या प्रभावी कामगिरीने पुरूषांसाठीचे मापदंड बदलायला भाग पाडले आहे. भारतात तर महिलांनी आपल्या कार्यकौशल्याने एका संस्कृतीची उभारणी केली असल्याचे सुरेश प्रभू यांनी सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Suresh prabhu lauds indira gandhi as most powerful pm of the country

ताज्या बातम्या