जस्ट डायलचा वापर वेश्याव्यवसायासाठी?; स्पा मसाजच्या चौकशीनंतर मिळाले १५० मुलींचे ‘रेटकार्ड’

महिला आयोगाच्या अध्यक्षांनी केलेल्या खोट्या चौकशीत ही गोष्ट समोर आली. त्यांनी याबद्दल तक्रारही केली आहे.

तंत्रज्ञान जसं चांगल्यासाठी वापरलं जातं, तसंच वाईट गोष्टींसाठीही वापरण्यात येतं. अवैध धंदे करण्यासाठीही या तंत्रज्ञानाचा, सोशल मीडियाचा वापर केला जातो. असाच एक प्रकार जस्ट डायल या साईटवर उघडकीस आला आहे. दिल्ली राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांनीच हा प्रकार उघडकीस आणला आहे. जस्ट डायलवरुन वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती त्यांना मिळाली आहे.

दिल्ली राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी जस्ट डायल या साईटवरुन स्पा मसाजबद्दल खोटी चौकशी केली. त्यानंतर त्यांना १५० हून अधिक मुलींचे ‘रेट्स’ सांगणारे मेसेजेस आले. त्यासोबत या मुलींचे फोटोही पाठवण्यात आले होते. मालीवाल यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन याविषयीची माहिती दिली आहे.

आपल्या ट्वीटमध्ये मालीवाल म्हणतात, आम्ही जस्ट डायलवर फोन करुन स्पा मसाजची खोटी चौकशी केली. त्यानंतर आम्हाला ५० मेसेज आले, ज्यामधून आम्हाला १५० अधिक मुलींचे दर सांगण्यात आले. मी जस्ट डायल आणि दिल्ली पोलीस गुन्हे शाखेला समन्स बजावत आहे. या धंद्याला चालना देण्यासाठी जस्ट डायलची भूमिका काय?

मालीवाल यांनी या ट्विटमध्ये या मेसेजेसचा स्क्रिनशॉटही पोस्ट केला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Swati maliwal complaints that just dial is promoting sex racket vsk

Next Story
बराक ओबामा यांची रोम्नींवर टीका