Tahawwur Rana India Extradition Live Updates: मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार असलेला तहव्वूर राणाला काही वेळेतच भारतात आणले जात आहे. अमेरिकेकडून त्याच्या प्रत्यार्पणाला हिरवा सिग्नल मिळाल्यानंतर भारतीय पथक अमेरिकेत दाखल झाले होते. भारतात आणल्यानंतर राष्ट्रीय तपास यंत्रणांकडून त्याची चौकशी केली जाईल आणि नंतर त्याला न्यायालयात सादर केले जाईल.
इंडियन एक्स्प्रेसने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, तहव्वूर राणाला भारतात आणण्याकरता राष्ट्रीय तपास संस्थेचे (एनआयए) तीन वरिष्ठ अधिकारी अमेरिकेत गेले होते. महानिरीक्षक दर्जाचे अधिकारी आशिष बत्रा यांच्या नेतृत्वाखालील तीन सदस्यीय एनआयए पथकात उपमहानिरीक्षक दर्जाचे अधिकारी जया रॉय आणि एक उपअधीक्षक दर्जाचे अधिकारी यांचा समावेश आहे.
इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, दिल्ली आणि मुंबईतील दोन तुरुंगांमध्ये कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. कारण, भारतात आल्यानंतर राणाला चौकशीसाठी राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) कोठडीत ठेवण्यात येणार आहे.
Tahawwur Rana India Extradition Live Updates | तहव्वूर राणाचे भारतात प्रत्यार्पण
Tahawwur Rana India Extradition Live Updates: तहव्वूर राणाला भारतात आणलं, NIA कडून चौकशी सुरू
मुंबईवर झालेल्या २६/११ दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार तहव्वूर राणाला दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आणण्यात आले आहे. खराब हवामानामुळे अमेरिकेहून येणारे विमान काहीसे उशीरा उतरले. विमानतळावर उतरल्यानंतर राणाला एनआयएच्या मुख्यालयात चौकशीसाठी नेण्यात आले आहे.
दहशतवादी तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणाचे श्रेय मोदी सरकारचे नाही, असा दावा काँग्रेस नेते पी. चिदम्बरम यांनी केला आहे. यूपीए सरकारच्या काळात जी पूर्वतयारी करण्यात आली, त्यामुळेच आज तहव्वूर राणाचे प्रत्यार्पण शक्य होत आहे, असे पी. चिदम्बरम म्हणाले.
Tahawwur Rana Family : वडील शाळेचे मुख्याध्यापक, तर भाऊ सैनिक अन् पत्रकार; तहव्वूर राणाचं कुटुंब आहे उच्चशिक्षित!
Tahawwur Rana Family : मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर राणा १७ वर्षांनी अमेरिकेतून भारतात आणला जात आहे. अशा परिस्थितीत, राणाचे कुटुंब काय करते ते पाहुयात.
Tahawwur Rana: २६/११ चा सूत्रधार तहव्वुर राणाशी थेट कनेक्शन असलेला डेव्हिड कोलमन हेडली कोण आहे?
Tahawwur Rana And David Coleman Headley Connection: मुंबईतील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील प्रमुख आरोपी तहव्वुर हुसेन राणाला अमेरिकेतून भारतात परत आणण्याचि प्रक्रिया सुरू झाली आहे. या घटनेमुळे आता राणाचा जवळचा सहकारी डेव्हिड कोलमन हेडलीबाबतही सर्वत्र चर्चा होऊ लागली आहे. हे दोघेही २००८ च्या मुंबई बॉम्बस्फोटातील प्रमुख सूत्रधार आहेत. या बॉम्बस्फोटात २० सुरक्षा दलाचे कर्मचारी आणि २६ परदेशी लोकांसह १६६ लोकांचा मृत्यू झाला होता.
छोटू चहावाल्याची तहव्वूर राणाला फाशीची शिक्षा देण्याची मागणी