Consumer Court Fined Tailoring Shop For Stitching Wrong Size Shirt: केरळमधील एर्नाकुलम जिल्हा ग्राहक न्यायालयाने योग्य मापाचा शर्ट न शिवल्याबद्दल एका शिलाई दुकानाला १२,३५० रुपयांचा दंड ठोठावला आहे. थ्रिक्काकारा येथील थॉमस जिमी यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून ग्राहक न्यायालयाने पलारीवट्टोममधील एका शिलाई दुकानाविरोधात ही कारवाई केली. तक्रारदार ऑगस्ट २०२३ मध्ये नवीन शर्ट शिवण्यासाठी एका शिलाई दुकानात गेला होता. त्यावेळी त्याने त्याला ज्या मापाचा शर्ट शिवायचा होता त्या मापाचा त्याचा जुना शर्ट आणला होता.

पण, जेव्हा ग्राहकाला शिवलेला नवीन शर्ट मिळाला तेव्हा तो पूर्णपणे निरुपयोगी होता कारण, त्याचे माप चुकीचे होते. शर्ट अर्टर करण्यासाठी दुकानाशी संपर्क साधला, पण याला दुकानदाराने नकार दिला. यानंतर ग्राहकाने वैतागून त्याने दुकानाला कायदेशीर नोटीसही पाठवली, परंतु त्याला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

यानंतर थॉमस यांनी ग्राहक न्यायालयाला संपर्क साधला आणि या घटनेमुळे झालेल्या आर्थिक नुकसानाची आणि मानसिक त्रासाची भरपाई मागितली. यावर ग्राहक आयोगाला असे आढळून आले की, शिलाई दुकान ग्राहकाला वचन दिलेली सेवा पुरवण्यात अयशस्वी ठरले आहे.

यावेळी ग्राहक न्यायालयाने म्हटले आहे की, “पैसे आणि स्पष्ट सूचना मिळाल्यानंतरही, दुकानदार योग्य सेवा पुरवण्यात अपयशी ठरणे हे केवळ सेवेतील कमतरताच नाही तर तक्रारदाराने त्यांच्यावर ठेवलेल्या विश्वासाचा अवमान देखील आहे. तसेच शर्ट अर्टर करण्यास किंवा पैसे परत करण्यास नकार देणे आणि कायदेशीर नोटीसला उत्तर न देणे हे, जबाबदारी आणि व्यावसायिकतेचा अभाव दर्शवते.”

त्यामुळे ग्राहक न्यायालयाने शिलाई दुकानाला १२, ३५० रुपयांचा दंड ठोठावला. दंडाच्या या रकमेत ५५० रुपये शिलाई शुल्क आणि १,८०० रुपये कापडाची किंमत, तसेच मानसिक त्रास आणि न्यायालयीन खर्चासाठी ५,००० रुपये यांचा समावेश आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान दुसऱ्या एका प्रकरणात या न्यायालयाने नुकतेच, रेस्टॉरंटने मोफत ग्रेव्ही न दिल्याची तक्रार फेटाळून लावली आहे. या प्रकरणी निर्णय देताना न्यायालयाने म्हटले आहे की, “रेस्टॉरंटवर ग्राहकाला ग्रेव्ही पुरवण्याचे कोणतेही कायदेशीर किंवा कराराचे बंधन नव्हते. त्यामुळे रेस्टॉरंटच्या सेवेत ग्राहक संरक्षण कायदा, २०१९ अंतर्गत कोणतीही कमतरता निदर्शनास आली नाही.”