गेल्या महिन्याभरापासून भारतीय उपखंडातील शेजारी प्रांत तैवानवरून वातावरण तापू लागलं आहे. चीननं सातत्याने तैवानवर आपला हक्क सांगितला आहे. मात्र, गेल्या महिन्याभरात चीननं तैवानबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे. तैवानकडून देखील सातत्याने चीनच्या आक्रमणाची शक्यता आणि भिती वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर तैवानला जागतिक स्तरावर चीनविरोधात वाढता पाठिंबा मिळू लागला आहे. एकीकडे अमेरिका आणि युरोपियन युनियननं युद्ध झाल्यास चीनच्या विरोधात तैवानच्या बाजूने उतरणार असल्याचं जाहीर केलेलं असतानाच आता त्यामध्ये ऑस्ट्रेलियाचा देकील समावेश झाला आहे. ऑस्ट्रेलियाचे संरक्षण मंत्री पीटर डटन यांनी ही घोषणा केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चीनविरोधात तीन बलाढ्य देश एकत्र!

तैवानची स्वायत्तता धोक्यात येऊ नये, यासाठी भारतासह जागतिक स्तरावर अनेक देश प्रयत्नशील आहेत. यासंदर्भात चीनला जागतिक पातळीवरून अनेकदा इशारे देखील देण्यात आले आहेत. मात्र, तरीदेखील चीननं आपली भूमिका कायम ठेवल्यामुळे आता तैवानला पाठिंबा वाढू लागला आहे. अमेरिका, युरोप आणि आता ऑस्ट्रेलिया हे बलाढ्य देश तैवानच्या बाजूने आल्यामुळे आता चीनकडून देखील मोठ्या हालचाली होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

चीनशी युद्ध होणार? “तुम्ही एकटे नाहीत” म्हणत तैवानच्या बाजूने आता युरोपियन युनियनची उडी!

ऑस्ट्रेलियानं दिला इशारा

“जर अमेरिकेने या परिस्थितीत आक्रमक हालचाली करण्याचा निर्णय घेतला, तर सध्याच्या परिस्थितीत आम्ही अमेरिकेला पाठिंबा देणार नाही हे अकल्पित आहे”, असं ते डटन म्हणाले. “या प्रकरणात सर्व बाजूंचा विचार केला तर आक्रमक भूमिका घेण्याचा पर्याय आम्ही न स्वीकारण्याची शक्यता आहे, पण अशा प्रकारची परिस्थिती उद्भवेल असं मला वाटत नाही”, असं देखील डटन यांनी नमूद केलं.

अमेरिका आणि चीन युद्धाच्या उंबरठ्यावर? तैवान प्रश्नावरून जो बायडेन यांनी चीनला दिला स्पष्ट इशारा!

अमेरिकेनंही सुनावलं

जर चीनने आक्रमक भूमिका घेतली, तर अमेरिका आणि सहकारी देश आक्रमक भूमिका घेतील, असा स्पष्ट इशारा बुधवारी अमेरिकेचे गृहमंत्री अॅंथनी ब्लिंकन यांनी दिला आहे.

याविषयी बोलताना डटन म्हणाले, “चीननं तैवानमध्ये जाण्याचा आपला निर्धार वारंवार बोलून दाखवला आहे. त्यामुळे अशा परिस्थितीसाठी आपण पूर्णपणे तयार असू याची काळजी घ्यायला हवी”.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Taiwan issue australia to fight against china for taiwan america european union pmw
First published on: 13-11-2021 at 18:17 IST