आपल्या नेत्याचा वाढदिवस हटके पद्धतीने साजरा करण्याचा कार्यकर्त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो. अशाच एक प्रकार चेन्नईत घडला आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांच्या वाढदिवसानिमित्त एका कार्यकर्त्याने थेट उंट भेट दिला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून हा अनेकांच्या चर्चेचा विषय बनला आहे.

हेही वाचा – ग्रीसमध्ये मृत्यूतांडव! भरधाव रेल्वेंची समोरासमोर धडक; ३२ जणांचा मृत्यू, ८५ जखमी

बुधवारी तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांचा ७० वा वाढदिवस होता. कार्यकर्त्यांनी मोठ्या धुमधडाक्यात त्यांचा वाढदिवस साजरा केला. वाढदिवसानिमित्त त्यांना अनेकांनी भेटवस्तू दिल्या. मात्र, तिरुवन्नमलाई येथील एका कार्यकर्त्याने थेट उंट भेट दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.

एम.के. स्टॅलिन कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा स्वीकारण्यासाठी त्यांच्या कार्यलयात उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होती. अशातच तिरुवन्नमलाई येथील जाकीर शहा हे दोन वर्षांच्या उंटाला घेऊन हॉलमध्ये आले. या उंटाच्या पाठीवर डीएमकेचा झेंडा रंगवला होता. मात्र, स्टॅलिन यांनी शुभेच्छा स्वीकारल्यानंतर सुरक्षा रक्षकांनी लगेच या उंटाला बाहेर काढले. विशेष म्हणजे स्टॅलिन यांना यापूर्वी कार्यकर्त्यांनी गाय आणि बकरी भेट म्हणून दिली होती.

हेही वाचा – गॅस सिलिंडरची दरवाढ,घरगुती ५० रुपये, व्यावसायिक ३५० रुपयांनी महागले; ईशान्येकडील मतदान संपताच भाववाढ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, काल स्टॅलिन यांच्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदी, काँग्रेस नेते राहुल गांधी, कमल हसन, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांनी तसेच चित्रपटसृष्टीतील अनेकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या.