एका अल्पवयीन मुलाचे लैंगिक शोषण आणि त्याच्याशी लग्न केल्याच्या आरोपाखाली एका किशोरवयीन मुलीला तामिळनाडूच्या कोईम्बतूरमध्ये अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी सांगितले की, कोयंबटूरपासून ४३ किमी अंतरावर पोल्लाचीजवळ पेट्रोल बंकमध्ये काम करणाऱ्या मुलीने काही महिन्यांपूर्वी मुलाशी मैत्री केली होती. दोघेही २६ ऑगस्टपासून बेपत्ता होते आणि मुलाच्या पालकांनी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर दोघांनी लग्न करुन ते कोईम्बतूरमध्ये एकत्र राहत असल्याचे तपासात उघड झाले.
तामिळनाडूच्या कोईम्बतूर जिल्ह्यातील पोल्लाची येथील १९ वर्षीय तरुणीने १७ वर्षांच्या मुलासोबत कथितरित्या पळ काढला, त्याच्याशी लग्नाची गाठ बांधली आणि नंतर त्याच्यावर लैंगिक अत्याचार केला. अल्पवयीन मुलाच्या आईने केलेल्या तक्रारीनंतर संबंधित तरुणीला अटक करण्यात आली. दुसऱ्या दिवशी दोघे परत कोईम्बतूरला आले. ते भाड्याच्या घरात राहत होते. या काळात, तरुणीने मुलावर लैंगिक अत्याचार केले, असे टाइम्स ऑफ इंडियाने एका पोलीस अधिकाऱ्याच्या हवाल्याने म्हटले आहे.
मुलाच्या आईने या तरुणीविरोधात पोलिसांकडे तक्रार केली होती. तक्रारीची माहिती मिळाल्यानंतर आरोपी, अल्पवयीन मुलासह, पोल्लाची येथील महिला पोलीस ठाण्यात आली. त्यानंतर तिला अटक करण्यात आली. तिच्यावर लैंगिक अपराधांपासून मुलांचे संरक्षण (POCSO) कायद्याच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिला न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
आणखी वाचा- बलात्कार प्रकरणी अटक; पितृत्व चाचणी निगेटिव्ह आल्यावर अल्पवयीन मुलाला जामीन
दरम्यान, याआधी दिल्लीच्या न्यायालयाने एका व्यक्तीला १४ वर्षांच्या मतिमंद मुलासोबत वारंवार अनैसर्गिक संभोग केल्याबद्दल एका व्यक्तीला १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती. पीडित मुलाच्या साक्षीवर अवलंबून न्यायालयाने हा निर्णय दिला होता.
