teenager repes 10 year old girl in house after his murder ssa 97 | Loksatta

X

क्रूर! पॉर्न पाहून अल्पवयीन मुलाचा १० वर्षीय मुलीवर बलात्कार; नंतर गळा आवळून खून

याप्रकरणी मुलाला अटक करण्यात आली आहे.

क्रूर! पॉर्न पाहून अल्पवयीन मुलाचा १० वर्षीय मुलीवर बलात्कार; नंतर गळा आवळून खून
प्रातिनिधीक छायाचित्र

वसईतील २६ वर्षीय तरुणी श्रद्धा वालकरच्या खूनाने देश हादरला आहे. तिचा प्रियकर आफताब पूनावालाने श्रद्धाचे ३५ तुकडे करुन खून केला आहे. त्यातच आता मध्यप्रदेशातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. १७ वर्षीय अल्पवयीन मुलाने १० वर्षीय मुलीवर बलात्कार केला आहे. बलात्कारानंतर मुलाने मुलीचा गळा आवळून खून केला आहे. ही घटना समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.

मध्यप्रदेशची राजधानी रायपूरपासून ६० किलोमीटरवर असलेल्या बेमेटारा जिल्ह्यात शनिवारी ही घटना घडली. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली आहे. त्याच्यावर कलम ४५०, ३७६, ३७६ एबी, ३०२, आणि २०१ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा : भारतीय लष्कराला मिळाला ‘अर्जुन’, पाकिस्तानातून येणाऱ्या ड्रोनची करणार ‘शिकार’

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मुलाला मोबाईलवर पॉर्न पाहण्याचे व्यसन होते. शनिवारी आरोपीने पॉर्न पाहिलं. त्यानंतर शेजारील घरात असलेली मुलगी एकटी असल्याचे पाहून तिच्या घरात घुसला. घरात गेल्यावर मुलाने मुलीवर बलात्कार केला. नंतर मुलगी घरच्यांना सांगेन या भितीने तिचा स्कार्फने गळा दाबून खून करण्यान आला. मात्र, मुलीने आत्महत्या केल्याचे भासवण्यासाठी तिचा मृतदेह घरात लटकवण्यात आला.

हेही वाचा : ‘गद्दार’ वादावर पडदा, अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यात मनोमिलन; मुख्यमंत्री म्हणाले, “राहुल गांधींनी आम्हाला…”

याबाबत बोलताना बेमेटारा जिल्ह्याचे अतिरिक्त पोलीस अधिक्षक पंकज पटेल म्हणाले, मुलीने आत्महत्या केल्याचा अंदाज प्राथमिक चौकशीतून काढण्यात आला होता. मात्र, शवविच्छेदन केल्यानंतर तिच्या शरीरावर काही जखमा असल्याचं समोर आलं. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने तिच्या घराजवळ चौकशीसाठी काहीजणांना ताब्यात घेतलं होतं. त्यात एका अल्पवयीन मुलाचाही समावेश होता. चौकशीदरम्यान मुलाने गुन्ह्याची कबुली दिली, असे पटेल यांनी म्हटलं.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-11-2022 at 23:56 IST
Next Story
राजधानी हादरली: दिल्लीत २.५ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप