‘तहलका’तील पीडित पत्रकार महिलेने तरुण तेजपाल आणि शोमा चौधरी यांच्याशी मोबाईलवरून केलेल्या संभाषणांचे ‘रेकॉर्डिंग’ करून ठेवले आहे. नोव्हेंबरमध्ये गोव्यात संबंधित पत्रकार महिलेवर तेजपाल यांनी लैंगिक अत्याचार केल्याच्या घटनेनंतर तिच्याशी तेजपाल आणि ‘तहलका’च्या माजी व्यवस्थापकीय संपादक शोमा चौधरी यांनी मोबाईलवरून केलेल्या संभाषणाचे सर्व रेकॉर्डिंग तिने गोवा पोलीसांच्या ताब्यात दिले आहे. गोवा पोलीसांनीच ही माहिती तेथील न्यायालयात दिली.
लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपामुळे गोव्यातील न्यायालयाने तेजपाल यांना १२ दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली. पोलीसांनी तेजपाल यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्याची मागणी केली होती. हा गुन्हा अतिशय गंभीर असून, आम्हाला आरोपीविरोधात आणखी पुरावे गोळा करायचे आहेत. त्यामुळे तेजपाल यांना १४ दिवसांची कोठडी सुनावण्यात यावी, अशी मागणी सरकारी वकिलांनी केली. मात्र, न्यायालयाने तेजपाल यांना १२ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
संबंधित घटनेनंतर तेजपाल, शोमा चौधरी यांनी पीडित महिलेला पाठविलेल्या ई-मेल्सची प्रतही गोवा पोलीसांनी ताब्यात घेतली आहे. पीडित महिलेने मोबाईलवरील संभाषणाचे केलेले रेकॉर्डिंग आणि हॉटेलमधील सीसीटीव्ही चित्रीकरण याचा या प्रकरणामध्ये पुरावे म्हणून वापर करणार असल्याचे पोलीसांनी सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 12th Dec 2013 रोजी प्रकाशित
‘तहलका’तील पीडितेकडून तरुण तेजपाल आणि शोमा चौधरीच्या कॉल्सचे ‘रेकॉर्डिंग’
'तहलका'तील पीडित पत्रकार महिलेने तरुण तेजपाल आणि शोमा चौधरी यांच्यासोबत मोबाईलवरून झालेल्या संभाषणांचे रेकॉर्डिंग करून ठेवले आहे.

First published on: 12-12-2013 at 11:20 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tehelka journalist recorded calls from tarun tejpal shoma chaudhury