देशात धार्मिक सण उत्सव काळात मंदिरांमध्ये भाविकांच्या चेंगराचेंगरी प्रकरणाची दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि संबंधित राजसरकारला चांगलेच धारेवर धरले. यापुढे मंदिरांतील चेंगराचेंगरी प्रकरणे खपवून घेतली जाणार नाहीत. त्यासाठी योग्य नियोजन आणि सुरक्षाव्यवस्थेची काळजी संबंधित राज्यसरकारने घ्यावी असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.
एका वकिलाने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश पी.सत्यशीवम् यांनी केंद्र आणि राज्यांच्या प्रशासनाला नोटीस धाडली आहे. यानुसार, सणउत्सव काळात संबंधित राज्यांच्या सरकारने मंदिरांतील गर्दीचे योग्य नियोजन आणि सुरक्षेची जबाबदारी घ्यावी असे म्हटले आहे.