जम्मूमध्ये हिंसाचार करणारे चार अतिरेकी गुरुवारी सकाळी सीमेपलीकडून भारतात आल्याचे केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सांगितल़े. प्राथमिक अहवालातून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, घुसखोर अतिरेक्यांनी पहाटे भारतात प्रवेश करून आधी जम्मूतील पोलीस ठाण्यावर आणि नंतर लष्करी तळावर जोरदार हल्ला चढविला, असेही शिंदे यांनी सांगितल़े.
केंद्रीय गृह सचिव अनिल गोस्वामी यांनी दिलेल्या माहितीनुसार, अतिरेकी आणि सुरक्षा यंत्रणांतील चकमक सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होती़. या तीन ते चार अतिरेक्यांनी लष्कराचा वेष परिधान केला होता़. त्यांनी केलेल्या हल्ल्यात आठ जण ठार झाले आहेत़. त्यात एका लेफ्टनन्ट कर्नलचाही समावेश आह़े.
संग्रहित लेख, दिनांक 26th Sep 2013 रोजी प्रकाशित
अतिरेकी सीमेपलीकडून आले -शिंदे
जम्मूमध्ये हिंसाचार करणारे चार अतिरेकी गुरुवारी सकाळी सीमेपलीकडून भारतात आल्याचे केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सांगितल़े.

First published on: 26-09-2013 at 07:16 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Terrorists came from across the border shinde