Elon Musk on Twitter: ‘टेस्ला’, ‘स्पेसएक्स’ या कंपन्यांचे सीईओ एलॉन मस्क यांनी नुकताच ‘ट्विटर’वर ताबा मिळवला आहे. या कंपनीचे मालकी हक्क मिळताच मस्क यांनी काही धोरणांमध्ये बदलांचे संकेत दिले आहेत. वैविध्यपूर्ण दृष्टीकोनासह ट्विटर ‘कंटेंट मोडरेशन कॉन्सिल’ तयार करणार असल्याचे ट्वीट मस्क यांनी केले होते. याबाबत मस्क यांनी पुन्हा ट्वीट करत भूमिका स्पष्ट केली आहे. ट्विटरच्या ‘कंटेंट मोडरेशन’ धोरणामध्ये अद्याप बदल केले नसल्याचं मस्क यांनी म्हटलं आहे.
एलॉन मस्क यांनी घेतला ट्विटरचा ताबा, मालकी हक्क मिळताच CEO पराग अग्रवालांची हकालपट्टी
ट्विटरवरील मजुकराशी निगडित सर्व निर्णय आणि बंद झालेले खाते पुन्हा सुरू करण्यासंदर्भात कॉन्सिल निर्णय घेईल, असे मस्क म्हणाले होते. दरम्यान, ट्विटरवरील मजुकरासंदर्भात मस्क यांनी आणखी एक ट्वीट केलं आहे. ट्विटरवर विनोद कायदेशीर असेल, असे मस्क यांनी म्हटले आहे. कंपनीने या निर्णयाबाबतच्या नियम आणि अटी अद्याप स्पष्ट केलेल्या नाहीत.
Elon Musk Fired Parag Agrawal: नोकरी सोडताना भारतीय वंशाच्या अग्रवाल यांना मिळणार ३४५ कोटी; कारण…
ट्विटर खरेदी करताच मस्क यांनी यावरील मजकुरासंदर्भात प्रतिक्रिया दिली होती. “या प्लॅटफॉर्मवर विविध विचारसरणीचे लोक हिंसा टाळून वादविवाद करू शकतील. सध्या समाजमाध्यमं अतिउजवे आणि अतिडावे यात विभागली जाण्याची भीती आहे. त्यामुळे तिरस्कार आणि समाजातील दरी वाढत जाईल”, असे मस्क यांनी म्हटले होते. त्यानंतर ट्विटरमध्ये ‘कंटेंट मोडरेशन’ संदर्भात हालचालींना वेग आला आहे.
ट्विटरची मालकी मिळाल्यानंतर एलॉन मस्ककडे कंगना रणौतच्या चाहत्यांनी केली ‘ही’ मागणी, पाहा फोटो
ट्विटरची मालकी मिळताच एलॉन मस्क यांनी सीईओ पराग अग्रवाल यांच्यासह व्यवस्थापनातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. यामध्ये कायदा विभागाचे प्रमुख विजया गड्डे, मुख्य वित्तीय अधिकारी नेड सेगल यांचाही समावेश आहे. ट्विटरच्या सात हजार कर्मचाऱ्यांना बेरोजगारीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.