पाकिस्तानमधील विमानसेवा देणारी शासकीय कंपनी पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एअरलाईन्स (Pakistan International Airlines – PIA) सध्या एका वेगळ्याच अडचणीचा सामना करत आहे. पाकिस्तान एअरलाईन्सचे क्रू सदस्य कॅनडामध्ये गेल्यानंतर बेपत्ता होत आहेत. २०१९ सालापासून असे अनेक सदस्य कॅनडामध्ये गेल्यानंतर बेपत्ता झाले आहेत, अशी माहिती सिम्पल फ्लाईंग या संकेतस्थळाने दिली.

पाकिस्तानमधील डॉन (Dawn) या वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार, कॅनडाच्या टोरोंटोमध्ये क्रू सदस्य थांबलेल्या एका हॉटेलच्या खोलीत ‘धन्यवाद, पीआयए’ असा संदेश लिहिलेली चिठ्ठी आढळली. चौकशीअंती समजले की, मरियम रझा नावाच्या एअर होस्टेसने ही चिठ्ठी लिहून पळ काढला. इस्लामाबादहून निघालेले विमान २६ फेब्रुवारी रोजी टोरोंटोमध्ये पोहोचले. दुसऱ्याच दिवशी कराचीला परतीचा प्रवास होता. मात्र, मरियम रझा कामावर रुजू झाली नाही. त्यानंतर केलेल्या चौकशीत हा प्रकार उघडकीस आला. विमानतळ यंत्रणेने मरियमच्या खोलीची तपासणी केली असता, तिचा एअर होस्टेस गणवेष आणि त्यासोबत चिठ्ठी आढळून आली.

Indian Navy
भारतीय नौदलाची मोठी कारवाई; समुद्री चाच्यांच्या तावडीतून २३ पाकिस्तानी नागरिकांची केली सुटका
Mumbai Women Buys 19 Flats Worth 118 Crores In Malbar Hill
“बंगल्यासमोर बिल्डिंग बांधली, समुद्र कसा बघू?”, म्हणत दक्षिण मुंबईत १९ फ्लॅट्स विकत घेणारी ‘ती’ आहे तरी कोण?
kumar vishwas on arvind kejriwal
अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनंतर कुमार विश्वास यांची सूचक पोस्ट; दोनच ओळींमध्ये मांडली भूमिका!
devendra fadnavis and manoj jarange patil (1)
मनोज जरांगेंचा गौप्यस्फोट, “देवेंद्र फडणवीसांनी पहाटे तीन वाजता फोन केला आणि..”

पाकिस्तान निवडणुकीतील महत्त्वाचे राजकीय नेते कोण? कोणाची सत्ता येणार?

पाकिस्तानच्या एअरलाईन्सचा वापर करून दुसऱ्या देशात पळ काढणारी मरियम ही पहिली कर्मचारी नाही. गेल्या अनेक वर्षांपासून जी पद्धत सुरू झालीये, त्याचीच पुनरावृत्ती मरियमच्या प्रकरणातून दिसून आली. जानेवारी २०२४ मध्येच पीआयएचे फ्लाईट अटेन्डट फैज मुख्तार हे कॅनडात बेपत्ता झाले होते. पीआयएचे प्रवक्ते अब्दुल्हा हफिज खान यांनी सांगितले की, कॅनडात गेल्यानंतर फैज यांनी दुसऱ्या दिवशी परतीच्या विमानात रुजू व्हायला हवे होते, मात्र तसे झाले नाही.

२०१९ पासून कॅनडात घेत आहेत आश्रय

मरियम आणि फैज यांच्या आधीही अनेक क्रू सदस्यांनी कॅनडामध्ये आश्रय घेतला आहे, ज्यामुळे पीआयए अडचणीत आली आहे. यामुळे एअरलाईन्सचे आर्थिक नुकसान तर होत आहेच, त्याशिवाय विश्वासार्हतेलाही तडा गेला आहे. २०२४ च्या दुसऱ्याच महिन्यात दुसरी घटना घडल्यामुळे आता याची जगभर चर्चा होत आहे.

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉन केनेडी यांच्या पत्नी जॅकलीन केनेडी यांनी १९६२ मध्ये पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एअरलाईन्सचे कौतुक केले होते. ‘ग्रेट पिपल टू फ्लाय विथ’, असे उद्गार त्यांनी काढले होते. त्यानंतर पीआयएने या वाक्याला आपले घोषवाक्य बनविले होते.

विश्लेषण : मरियम नवाझ शरीफ.. बेनझीर भुत्तोंनंतर पाकिस्तानी राजकारणाची दिशा बदलणारी दुसरी महिला!

अभिजन वर्गाचा पाकिस्तानला राम राम

१९६० च्या दशकात पाकिस्तानची जी परिस्थिती होती, ती आज राहिलेली नाही, असे चित्र सध्या दिसत आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या भरमसाठ कर्जाचा बोजा पाकिस्तानवर आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक संस्थांकडून पाकिस्तानने मदत घेतली आहे. तसेच २०२३ मध्ये बौद्धिक संपदा असलेल्या अनेक मान्यवरांनी पाकिस्तानला राम राम ठोकून इतर देशात स्थायिक होण्याचा पर्याय निवडला. पाकिस्तानमध्ये आपले भविष्य अंधकारमय आहे, अशी भावना मनात घर करत असल्यामुळे कौशल्य असलेले अनेक कर्मचारी देशाच्या सीमा ओलांडून इतर देशात आश्रय शोधत आहेत.

२०१९ पासून पाकिस्तान एअरलाईन्सचे कर्मचारी परदेशात गेल्यानंतर बेपत्ता होत आहेत. मीडिया लाईन वृत्त संकेतस्थळाने सांगितले की, पीआयए क्रू सदस्य कॅनडा आणि इतर देशात गेल्यानंतर तिथे आश्रय मिळविण्याचा प्रयत्न करत आहेत. २०१९ पासून ही पद्धत सुरू झाल्याचे दिसते.

२०२३ मध्ये सात क्रू सदस्य परागंदा

मागच्या वर्षी पीआयएचे सात सदस्य कॅनडाच्या भूमीत उतरल्यानंतर परागंदा झाले आहेत. पीआयएचे प्रवक्ते अब्दुल्हा हाफिज खान यांनी दिलेल्या माहितीनुसार डिसेंबर २०२३ मध्ये दोन क्रू सदस्य लाहोरच्या अल्लामा इक्बाल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून टोरोंटोमध्ये गेले आणि तिथून ते परतीच्या विमानावर रुजू झाले नाहीत. त्यामुळे क्रू सदस्यांविनाच विमान पुन्हा इस्लामाबादकडे आणण्यात आले.

नोव्हेंबर आणि डिसेंबर २०२३ मध्ये अयाझ कुरेशी, खालिद अफ्रिदी आणि फिदा हुसैन शाह हे कॅनडात गेल्यानंतर परागंदा झाले.

अन्वयार्थ : कर्जफेडीच्या विळख्यात पाकिस्तान

कॅनडाचे उदारमतवादी आश्रय धोरण जबाबदार, पाकिस्तानचा आरोप

प्रवक्ते अब्दुल्हा फाफिज खान यांनी अरब न्यूजशी नोव्हेंबर २०२३ मध्ये बोलताना म्हटले की, कॅनडा सरकारचे उदारमतवादी धोरण यासाठी जबाबदार आहे. मागच्या काही वर्षांत प्रत्येक वर्षी तीन ते चार क्रू सदस्य टोरंटोमध्ये गेल्यानंतर परागंदा होत आहेत. पीआयएकडून कॅनडाच्या धोरणांवर टीका होत असली तरी तज्ज्ञ मात्र स्वतःच्या देशातील उदासीनतेकडे बोट दाखवितात. क्रू सदस्यांना मिळणारे कमी वेतन आणि एअरलाईन्सचे अधांतरी भवितव्य यामुळे क्रू सदस्यांना स्वतःच्या भविष्याची चिंता वाटते. त्यामुळे कॅनडामध्ये गेल्यानंतर मायदेशी परतण्याऐवजी ते तिथेच राहणे पसंत करत आहेत.

पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीनुसार, पाकिस्तानमध्ये सार्वत्रिक निवडणुका होण्याच्या दोन दिवस आधी पाकिस्तानच्या काळजीवाहू सरकारने पीआयएचे खासगीकरण करण्याचा निर्णय घेतला. आर्थिक चणचण सहन करणाऱ्या एअरलाईन्सला पुन्हा संजीवनी देण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे बोलले गेले.

समा टीव्हीने दिलेल्या माहितीनुसार मागच्या पाच वर्षांपासून वर्षाला सरासरी पाच क्रू सदस्य कॅनडामध्ये आश्रय घेणे पसंत करत आहेत. पीआयए प्रवक्ते खान यांनी सांगितले की, कॅनडामध्ये आश्रय घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना आम्ही तात्काळ बडतर्फ करून त्यांना दंड ठोठावला जातो. तसेच सेवेदरम्यानचे त्यांचे सर्व लाभ रद्द केले जातात.

विश्लेषण : पाकिस्तानमधील निवडणूक निकालाचा भारताशी संबंधांवर काय परिणाम?

आश्रय घेणारे सदस्य इतरांना मदत करतात

२०१८ साली माहिरा नावाच्या क्रू सदस्याने पहिल्यांदा पाकिस्तानमध्ये आश्रय घेतला होता. त्यानंतर तिने इतर क्रू सदस्यांना कायदेशीर मदत देऊन आश्रय मिळवून देण्यात मदत केली. प्रवक्ते खान यांनी सांगितले की, गेल्या काही वर्षात जे क्रू सदस्य कॅनडात आश्रय घेऊन रहात आहेत, ते आता नव्या कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करण्याचे काम करतात, ज्यामुळे नव्या लोकांनाही आश्रय मिळू शकेल.

पाकिस्तानमध्ये गेल्या काही काळापासून अभूतपूर्व अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. ढासळलेली अर्थव्यवस्था आणि अस्थिर राजकीय परिस्थितीमुळे महगाईने टोक गाठले आहे. त्यामुळे पाकिस्तानी नागरिक विदेशात जाण्याचा मार्ग चोखाळताना दिसतात. सामान्य नागरिकांना देशाबाहेर पडण्यासाठी जिथे संघर्ष करावा लागतो, तिथे पीआयएचे क्रू सदस्य मात्र फुकटात परदेशी भूमीवर पोहोचत आहेत. त्यामुळेच कदाचित मरियम रझाने ‘धन्यवाद, पीआयए’, अशी चिठ्ठी लिहून ठेवलेली असावी.