पीटीआय, नवी दिल्ली

जनगणना-२०२७च्या पहिल्या टप्प्यासाठी १० ते ३० नोव्हेंबर रोजी पूर्व-चाचणी सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमधील निवडक नमुना क्षेत्रांमध्ये आयोजित केली जाणार आहे.

देशाचे महानिबंधक आणि जनगणना आयुक्त मृत्युंजय कुमार नारायण यांनी एका राजपत्रित अधिसूचनेत म्हटले आहे की १ ते ७ नोव्हेंबर दरम्यान स्व-गणनेचा पर्यायदेखील उपलब्ध असेल. १ एप्रिल २०२६ ते २८ फेब्रुवारी २०२७ दरम्यान दोन टप्प्यांमध्ये होणाऱ्या जनगणनेची परिणामकारकता तपासण्यासाठी पूर्व-चाचणी करण्यात येणार आहे. यामध्ये घरांची यादी आणि गृहसंग्रह वेळापत्रक (एचएलओ) आणि लोकसंख्या गणना यांचा समावेश आहे.

ही पहिली डिजिटल जनगणना असेल, ज्यामध्ये नागरिकांच्या जातीची गणनादेखील केली जाईल. चाचणी टप्प्यात या मोठ्या प्रक्रियेतील सर्व पैलूंचे मूल्यांकन केले जाईल. त्यामुळे प्रक्रियेतील सर्व समस्या दूर होतील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. पहिल्या टप्प्यात प्रत्येक घराची निवासी स्थिती, मालमत्ता आणि सुविधांची माहिती गोळा केली जाईल.

दुसऱ्या टप्प्यात प्रत्येक घरातील प्रत्येक व्यक्तीची लोकसंख्याशास्त्रीय, सामाजिक-आर्थिक, सांस्कृतिक आणि इतर तपशील गोळा केले जातील. ही प्रक्रिया १ फेब्रुवारी २०२७ रोजी होणार आहे, असे अधिसूचनेत म्हटले आहे.