गेल्या महिन्याभरापासून इस्रायल आणि हमास यांच्यात युद्ध पेटलं आहे. गाझा पट्टीवर इस्रायलकडून सातत्याने हल्ले चढवले जात आहेत, तर हमासकडूनही प्रत्युत्तर दिलं जातंय. या दरम्यान, इराण समर्थक हेजबोला संघटनेचे प्रमुख हसन नसरल्ला यांनीही शुक्रवारी इस्रायला आणि अमेरिकेला इशारा दिला आहे. इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध असंच चालू राहिलं तर त्यांच्यातील युद्ध प्रादेशिक संघर्षात रुपांतरित होईल. जर हे युद्ध इतर देशांमध्येही पसरलं तर याला अमेरिका जबाबदार असेल असंही ते म्हणाले.

इस्रायल आणि हमास यांच्यात गेल्या महिन्याभरापासून युद्ध चालू आहे. यादरम्यान, हेजबोलाचे प्रमुख हसन नसरल्ला यांनी पहिल्यांदाच जाहीर भाषण केलं. ते म्हणाले की हे युद्ध लेबनॉनपर्यंत पोहोचण्याकरता अनेक पर्याय खुले आहेत. गाझा पट्टी आणि तेथील लोकांवरील हल्ल्यांना अमेरिका पूर्णपणे जबाबदार आहे आणि इस्रायल मात्र एक माध्यम आहे.

हेही वाचा >> पाकिस्तानच्या हवाई तळावर दहशतवादी हल्ला, लष्कराच्या प्रत्युत्तरात तीन हल्लेखोर ठार

“प्रादेशिक युद्ध थांबवायचं असेल तर गाझा पट्टीवरील आक्रमण थांबवावं लागेल”, अशी सूचनाही नसरल्ला यांनी दिली. पूर्व भूमध्य सागरात अमेरिकेने युद्धनौका सज्ज ठेवल्या आहेत. त्यावरही नसरल्ला यांनी शाब्दिक हल्ला चढवला आहे. ते म्हणाले की, भूमध्य सागरातील तुमच्या ताफ्याला आम्ही घाबरत नाही. तुम्ही जो ताफा दाखवून घाबरवत आहात त्याविरोधात आम्ही लढायला तयार आहोत. क्षेत्रीय युद्ध सुरू झाल्यास तुमचा ताफा काहीही कामाचा नाही. या युद्धाला हवाई मदतही मिळणार नाही. हे युद्ध सुरू झाल्यास तुमचे लष्कर आणि तुमच्या ताफ्याला किंमत चुकवावी लागणार आहे, असाही इशारा अमेरिकेला दिला आहे.

व्हाईट हाऊसकडून प्रत्युत्तर

नसरल्ला यांच्या इशाऱ्यावर व्हाईट हाऊसकडूनही प्रत्युत्तर आलं आहे. व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरिन जीन-पियरे म्हणाल्या की हिजबुल्लाने चालू असलेल्या संघर्षाचा फायदा घेण्याचा प्रयत्न करू नये. इस्रायल आणि लेबनॉनमध्ये २००६ पेक्षा जास्त रक्तरंजित युद्ध होण्याची शक्यता आहे. युनायटेड स्टेट्सला या संघर्षाचा विस्तार लेबनॉनमध्ये पाहायचा नाही.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२००६ मध्ये, इस्रायल आणि हिजबुल्ला यांच्यातील संघर्षात लेबनॉनमध्ये १२०० हून अधिक लोक मारले गेले होते. तर, इस्रायलमध्ये १६० नागरिकांचे प्राण गेले होते. यामध्ये लष्करातील जवानही शहीद झाले होते.