देशात करोनाने हाहाकार केला आहे. देशातील शिक्षण व्यवस्थेवर देखील याचा मोठा परीणाम झाला आहे. दरम्यान, करोनाच्या पार्श्वभूमीवर शैक्षणिक सत्र २०२१-२२ पासून पदवीपूर्व प्रवेशासाठी केंद्रीय विद्यापीठातील सामान्य प्रवेश परीक्षा (CUCET) यावर्षी लागू केली जाणार नाही, अशी घोषणा विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) रविवारी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP) २०२० अंतर्गत सूचित केलेल्या केंद्रीय विद्यापीठांमधील सर्व पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सीयूसीईटीच्या कार्यपद्धती तपासण्यासाठी एक समिती गठीत केली होती.

तसेच यूजीसीने शनिवारी सर्व विद्यापीठे आणि महाविद्यालयांना १ ऑक्टोबरपर्यंत नवीन पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी वर्ग सुरू करण्याचे निर्देश दिले. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळासह शालेय मंडळे ३१ जुलैपर्यंत निकाल जाहीर झाल्यानंतर उच्च शैक्षणिक संस्थांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू करतील.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: There will be no entrance exam for graduate admission this year ugc decision srk
First published on: 19-07-2021 at 10:46 IST