Lucknow Love Jihad Case: लखनऊमधील एका अल्पवयीन मुलीनं सासरच्या कुटुंबावर लव्ह जिहादसह अनेक खळबळजनक आरोप केले आहेत. पती मोहम्मद नझील आणि त्याच्या कुटुंबियानी बळजबरीनं बीफ खायला घातलं आणि मारहाण केली. तसेच बलात्कार केल्याचा आरोप अल्पवयीन मुलीनं केला आहे. आरोपींवर कठोर कारवाई कारवाई करावी, अशी मागणी पीडितेनं केली आहे.
पीडितेनं म्हटलं की, शाळेत असताना तिची नझीलशी ओळख झाली आणि तेव्हापासून तिच्यावर अत्याचार सुरू आहे. नझीलच्या कुटुंबियांनी अनेकदा मारहाण केली, तसेच बलात्कार करण्याचा प्रयत्न आणि जीवे मारण्याची धमकी दिली, असा आरोप पीडितेनं केला. ४ एप्रिल २०२५ रोजी नझीलनं गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचाही दावा पीडितेनं केला आहे.
अल्पवयीन असताना नझीलनं बलात्कार केला आणि माझे नग्न व्हिडीओ काढले, असेही पीडितेनं तक्रारीत म्हटले आहे. व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत त्याने लग्नासाठी दबाव टाकला. लग्न करण्यापूर्वी मी इस्लाम धर्म स्वीकारावा, अशी बळजबरीही नझीलनं केली, त्यामुळे १८ ऑगस्ट २०२० रोजी इस्लाम धर्म स्वीकारल्याचे पीडितेने सांगितलं.
पीडितेनं पुढं सांगितलं की, लग्नानंतरही नझीलचा त्रास सहन करावा लागत आहे. तो कॉल गर्ल्सना घरी आणतो. तसेच त्याचे भाऊ आदिल आणि कादीर हेदेखील लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न करतात, असा आरोप पीडितेनं केला. २१ जानेवारी २०२२ रोजी पीडितेनं मुलीला जन्म दिला. मात्र मुलीच्या संगोपनासाठी नझीलकडून आर्थिक मदत दिली जात नाही. त्यामुळे मी नोकरी करण्याचा निर्णय घेतला. यालाही त्याच्याकडून विरोध असल्याचे तिनं सांगितलं.
पीडितेनं पुढं सांगितलं की, नझीलनं बळजबरीने आपल्याला गोमांस खाण्यास भाग पाडलं. तसेच मला आणि मुलीला मद्य आणि कोरेक्स सिरप पिण्यास भाग पाडलं. त्याचे कुटुंबिय माझ्या इच्छेविरुद्ध मला नमाज पठण करण्यास दबाव टाकत आहेत.
या अत्याचाराची वाच्यता बाहेर करू नये, यासाठी नझील आणि त्याच्या कुटुंबियांनी डांबून ठेवले होते. तसेच याबद्दल तक्रार केल्यास कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली होती. वडिलांच्या मृत्यूनंतर कुटुंबाची स्थिती हलाखाची झाली होती, त्यामुळे आपण इतके वर्ष गप्प राहिलो, असेही आता पीडितेनं सांगितलं आहे.