Things Indian students should know before Moving to US For Study : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने घेतलेल्या काही मोठ्या निर्णयाचे पडसाद जगभरात पाहायला मिळत आहेत. ट्रम्प प्रशासनाने आंतरराष्ट्रीय विद्यार्थी व्हिसा रद्द करणे तसेच विद्यापीठांच्या निधीत कपात करणे यासारखे निर्णय घेतल्याने भारतीय विद्यार्थ्यांच्या अमेरिकेत शिक्षण घेण्याच्या स्वप्नांवर पाणी फेरले गेले आहे. अमेरिकेत २०२३-२४ मध्ये ३.३१ लाख विद्यार्थी अमेरिकेत शिक्षण घेत होते. ज्यापैकी १.९६ लाख म्हणजेच जवळजवळ ६० टक्के विद्यार्थी हे पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेत होते.
अमेरिकेत यावर्षी शिक्षण घेण्यासाठी जात असलेल्या आणि पुढील शैक्षणिक वर्षाकरिता अर्ज करत असलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षण सल्लागार आणि इमिग्रेशन वकीलांनी महत्त्वाचा सल्ला दिला आहे. “तुमचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर भारतात परत येण्याची तयारी ठेवा,” असे शिक्षण सल्लागार विराल दोशी यांनी अंडरग्रॅज्युएट विद्यार्थ्यांना सुचवले आहे. ते पुढे बोलताना म्हणाले की, “जर तुम्ही अमेरिकेत जाणार आसाल, तर शिकण्याची इच्छा बाळगा. आणि इंटर्नशिप आणि नोकऱ्या मिळवणे हे मागील वर्षांपेक्षा जास्त कठीण असणार आहे, याबद्दलची मानसिक तयारी ठेवा.”
विराल दोशी यांनी जी कारणे सांगितली त्यामध्ये अमेरिकन काँग्रेसमध्ये सादर करण्यात आलेल्या ऑप्शनल प्रॅक्टिकल ट्रेनिंग (OPT) प्रोग्राम रद्द करण्यासाठीच्या नवीन विधेयकाचा देखील समावेश आहे. या विधेयकामध्ये एफ१ व्हिसावर असलेल्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना अमेरिकेत तात्पुरते काम करण्याची परवानगी देण्यात येते. ते पुढे बोलताना म्हणाले की, “मेक अमेरिका ग्रेट अगेन परिस्थितीमुळे उद्भवलेल्या राष्ट्रवादामुळे कदाचित अमेरिकन नागरिकांना नोकऱ्यांमध्ये प्राधान्य मिळेल. आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांबरोबरच कंपन्या देखील त्यांना H1B व्हिसा मिळेल की नाही याचा विचार करून ते देशात काही वर्ष तरी काम करू शकतील याबद्दल अनिश्चित आहेत.”
संशोधन किंवा इतर तात्पुरत्या नोकरीवर अवलंबून राहू नका
Eduabroad कन्सल्टिंगच्या सीईओ प्रतिभा जैन यांनी सांगितले की, अमेरिकेत पोस्ट ग्रॅज्युएट विद्यार्थी रिसर्च असिस्टंटशीप शोधणे हे खूप सामान्य आहे, यामुळे त्यांना काही प्रमाणात त्यांच्या दैनंदिन खर्च भागवता येतो. “विद्यापीठांसाठी संशोधन निधीवर परिणाम झाला असल्याने हे शक्य होणार नाही. निधी जरी कमी करण्यात आला असला तरी, तो अमेरिकन नागरिकांसाठी असू शकते. म्हणून, जर एखाद्या विद्यार्थ्याकडे त्यांच्या ८० टक्के गरजा भागवण्यासाठी पैसे असतील आणि उर्वरित २० टक्के गरजांसाठी तो रिसर्च असिस्टंटशिपवर अवलंबून असतील, तर त्यांच्याकडे पैसे येईपर्यंत त्यांनी त्यांचा प्रवेश पुढे ढकलला पाहिजे,” असे त्या म्हणाल्या.
त्या पुढे बोलताना म्हणाल्या की, “संशोधन किंवा असिस्टंटशिप किंवा पार्ट टाईम काम यासारख्या कॅम्पसमधील नोकऱ्यांवर अवलंबून राहू नये. विद्यार्थ्यांनी पैसे हातात ठेवूनच प्रवेश घ्यावा.”
नियम काटेकोरपणे पाळा
जैन पुढे बोलताना म्हणाल्या की, “कोणतीही तडजोड केली जाणार नाही. विद्यार्थ्यांना चांगले रेकॉर्ड ठेवावे लागे. त्यांची उपस्थिति चांगली ठेवावी लागेल. आम्ही विद्यार्थ्यांना ते अमेरिकेला निघण्यापूर्वी शैक्षणिकदृष्ट्या तयार राहाण्याचा सल्ला देत आहोत. उपस्थिती आणि शैक्षणिक आवश्यकता दोन्ही पूर्ण करा, कारण कोणतीही सवलत दिली जाणार नाही.”
आधी, असे काही विद्यार्थी असायचे जे ग्रेड पूर्ण करत नसत. एक मोठा बदल होत असल्याने आणि विद्यार्थ्यांना शैक्षणिक गथीशी जुळवून घेण्यासाठी वेळ लागतो, त्यामुळे यापूर्वी सुरूवातीला विद्यार्थांना इशारा दिला जात असे. विद्यापीठांकडून सौम्य दृष्टिकोन बाळगला जात असे आणि विद्यार्थ्यांना वेळ दिला जात असे. आता कदाचित असे होणार नाही.”
सोशल मीडियावर पोस्ट करताना काळजी घ्या
विद्यार्थी सल्लागार आणि वकील हे विद्यार्थ्यांना त्यांच्या सोशल मीडियावर आपण काय पोस्ट करतो याबद्दल काळजी घेण्याचा सल्ला देत आहेत. दोशी म्हणाले की, “खाजगीत सोशल मीडियावर केलेल्या पोलिटिकल अॅक्टिवीजम बाबात काळजी घ्या”
आयडीपी एज्युकेशनचे दक्षिण आशिया, कॅनडा, लॅटिन अमेरिका आणि मॉरिशसचे प्रादेश मॅनेजर पियुष कुमार यांनी सांगितले की, विद्यार्थ्यी ते सोशल मीडिया अकाउंटवर कशा प्रकारचा कंटेंट पोस्ट करत आहेत याबद्दल काळजी घ्यावी, त्यांच्या पोस्टमुळे सोशल फॅब्रिक किंवा देशातील शांततेला बिघडणार नाही याची दक्षता त्यांनी घ्यावी.
कुमार यांनी यूजी, पीजी आणि पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक चेक लिस्ट दिली आहे. ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी कोणती काळजी घ्यावी याबद्दल माहिती देण्यात आली आहे.
१) विद्यापीठ आणि व्हिसा यासंबंधीच्या नियमांचे पालन करा
२) सर्व फॉर्म वैयक्तिकरित्या सबमिट करा
३) तुमची आय-२०, व्हिसा आणि आर्थिक कागदपत्रे काळजीपूर्वक तपासा
४) वैयक्तिक बचत किंवा शैक्षणिक कर्ज याच्या माध्यमातून जमा केलेला निधी अपुरा पडणार नाही याकरिता पर्यायी योजना तयार ठेवा.
पदव्युत्तर शिक्षणासाठी जाणाऱ्यांनी विचार करावा
पुढील शैक्षणिक वर्षासाठी जैन यांनी पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्यांना काळजीपूर्वक निर्णय घेण्याच सल्ल दिला आहे. “पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा जास्त परिणाम होण्याची शक्यता आहे. शिक्षणाच्या गुणवत्तेवर परिणाम होणार नाही, परंतु अभ्यासानंतर काम, नोकऱ्या, इंटर्नशिप यावर काही वर्षांसाठी परिणाम होईल.”
त्या पुढे बोलताना म्हणाल्या की पदवीचे शिक्षण घेणारे काही प्रमाणात सुरक्षित आहेत कारण त्यांचा प्रोग्राम हा चार वर्षांचा असतो आणि त्यामुळे त्यांच्यासाठी परिस्थिती स्थिर होण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो.
विद्यार्थ्यांनी सध्या काय करावे
१)अमेरिकेत नोकरी किंवा असिस्टंटशिप अशा नोकरीवर अवलंबून राहू नका
२) जाण्यापूर्वी तुम्हाला मिळालेल्या एकूण निधीपैकी किमान ८० टक्के रक्कम ताब्यात घ्या
४) व्हिसा, शैक्षणिक आणि वर्तणुकीसंबंधीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करा
५) सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या अनावश्यक गोष्टी काढून टाका – वादग्रस्त किंवा राजकीय विषयांसंबंधी पोस्ट टाळा
६) तुमचा शैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर घरी परतण्यासाठी मानसिकदृष्ट्या तयारी ठेवा
७) कर्ज घेत असाल तर तुमची अमेरिकेत शिक्षण घेण्याची योजना एक किंवा दोन वर्षांनी पुढे ढकलण्याचा विचार करा