जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपोराच्या त्राल परिसरातील चेवा उल्लार येथे जवानांनी तीन दहशतावाद्यांचा खात्मा केला आहे. तिन्ही दहशतवाद्यांचे मृतदेह त्यांच्या शस्त्रांसह ताब्यात घेण्यात आले आहेत. त्राल परिसरात काल संध्याकाळपासून चकमक सुरू झाली होती. अखेर तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात जवानांना यश आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या परिसरात दहशतवादी दडून बसले असल्याची माहिती मिळाल्यानंतर जवानांनी परिसरास वेढा देऊन शोधमोहीम सुरू केली होती. याची दहशतवाद्यांना जाणीव होताच, दहशतवाद्यांनी जवानांवर बेछुट गोळीबार करण्यास सुरूवात केली, यानंतर चकमकीस सुरूवात झाली होती.

त्राल परिसरात काल संध्याकाळपासून चकमक सुरू झाली होती. अखेर तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात जवानांना यश आले. ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांमध्ये श्रीनगर येथील फारूक लंगू व मोसीन, बिजबेहाडा समथन येथील शाहिद भट यांचा समावेश असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, पोलिसांनी याबाबत अधिकृतपणे अद्याप सांगतिलेले नाही.

आणखी वाचा- सीआरपीएफ जवानांवर दहशतवाद्यांचा गोळीबार, एक जवान शहीद; १२ वर्षाच्या मुलाचाही मृत्यू

दरम्यान, जम्मू काश्मीरमधील अनंतनाग येथे सीआरपीएफ जवानांवर दहशतवाद्यांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात सीआरपीएफचा एक जवान शहीद झाला असून एका स्थानिक मुलाचाही मृत्यू झाला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, १२ वाजेच्या सुमारास दहशतवाद्यांनी अनंतनागमध्ये सीआरपीएफच्या ९० बटालियनवर हल्ला केला. एएनआयने यासंबंधी वृत्त दिलं आहे.

जम्मू- काश्मीरमधील विविध भागांमध्ये दहशतवाद्यांविरोधात जवानांकडून जोरदार कारवाई सुरू आहे. या अगोदर जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातील सोपार येथे जवानांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला होता.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Third terrorist neutralised in the encounter at chewa ular in tral area of awantipora msr
First published on: 26-06-2020 at 15:42 IST