काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांच्या नैनीताल येथील घरी आज तोडफोड करून आग लावण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे एकच खबळबळ उडाली असुन, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. सध्या सलमान खुर्शीद यांच्या ‘सनराईज ओव्हर अयोध्या’ या पुस्तकावरून मोठा वाद सुरू झालेला आहे. या पुस्तकात सलमान खुर्शीद यांनी हिंदुत्वाची तुलना बोको हराम किंवा आयसिससोबत केल्याची टीका केली जाऊ लागली आहे. तसेच या मुद्द्यावरून भाजपाने देखील आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसत आहे.

दरम्यान, आज ही खळबळजनक घटना समोर आली आहे. या घटनेवर सलमान खुर्शीद यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देखील दिली आहे. “मी (माझ्या पुस्तकात) असे म्हटले आहे की जे लोक अशा गोष्टी करतात ते हिंदू धर्माचे नाहीत. हिंदू धर्म हा एक सुंदर धर्म आहे ज्याने या देशाला एक विलक्षण संस्कृती दिली आहे आणि मला त्याचा अभिमान आहे. हा हल्ला माझ्यावर नाही तर हिंदू धर्मावर आहे.” असं काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांनी म्हटलं आहे.

तसेच, सलमान खुर्शीद यांनी त्यांच्या घराला आग लागल्याचे व झालेल्या तोडफोडीचे काही फोटो व व्हिडिओ फेसबुकवर शेअर देखील केले आहेत. या फोटो पोस्ट करताना त्यांनी म्हटले आहे की, ”मी अजुनही चुकीचा आहे का? हे हिंदुत्व असू शकतं का?”

काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांच्या घरी तोडफोड आणि जाळपोळ!

याचबरोबर त्यांनी माध्यमांनी प्रतिक्रिया देताना हे देखील सांगितले की, ”मला हिंदू धर्मावर गर्व आहे. जाळपोळीच्या घटनेने हे सिद्ध केले की मी योग्य होतो. अशा लोकांना हिंदू धर्माशी काही घेणंदेणं नसतं. हा हल्ला माझ्यावर नाही हिंदू धर्मावर आहे. माझ्या पक्षाने माझ्या म्हणण्याचं समर्थन केलं आहे. पक्षाच्या प्रमुखांनी माझ्या बोलण्याला योग्य म्हटलं आहे. माझे दरवाजे खुले आहेत, ज्यांना हवं ते येऊ शकतात.”

दरम्यना या घटनेप्रकरणी राकेश कपिल आणि अन्य २० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, अशी माहिती कुमाऊचे डीजीआय नीलेश आनंद यांनी दिली आहे.

हिंदुत्वाची तुलना आयसीस आणि बोको हरामशी केल्याच्या आरोपांवर सलमान खुर्शीद यांचं स्पष्टीकरण; म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संभलमध्ये आयोजित कार्यक्रमात काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सलमान खुर्शीद म्हणाले की, “दहशतवादी संघटना आयसीस आणि हिंदुत्व एकच आहेत असे मी माझ्या पुस्तकात म्हटले नाही. पण दोन्ही एकसारख्या आहेत, असं मी म्हटलंय. ISIS आणि बोको हराम इस्लाम धर्माचा गैरवापर करतात, असंही मी म्हटलंय. परंतु इस्लामच्या अनुयायांपैकी कोणीही यावर आक्षेप घेतला नाही. मी त्यांच्या धार्मिक भावना दुखावत आहे, असे कोणीही म्हटले नाही.”