जगातील सर्वात मोठ्या धार्मिक कार्यक्रमांपैकी एक अशी ओळख असणाऱ्या हरिद्वारमधील कुंभमेळ्यासाठी भक्तांनी रविवारी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. एकीकडे करोनाचा कहर वाढत असताना दुसरीकडे यावेळी लोकांकडून करोनाच्या नियमांचं जाहीरपणे उल्लंघन करण्यात आलं आहे. मास्क तसंच सोशल डिस्टन्सिंगचं पालन यावेळी करण्यात आलं नाही.

गंगा नदीत स्नान करण्यासाठी पवित्र दिवस मानल्या जाणाऱ्या शाही स्नानाच्या एक दिवस आधी लाखोंच्या संख्येने भक्तांनी नदीकिनारी गर्दी केली होती. आरोग्य मंत्रालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या नियमांचं जाहीरपणे हे उल्लंघन होतं. अनेक भाविकांनी यावेळी हरिद्वारला येताना निगेटिव्ह रिपोर्ट सादर करणं सरकारने अनिवार्य केलं असल्याने करोना हा येथे चिंतेचा विषय नसल्याचा दावा केला.

१२ वर्षातून एकदा होणारा कुंभमेळा सध्या करोनाच्या संकटात पार पडत आहे. देशात करोनाची दुसरी लाट आलेली असून गेल्या २४ तासांत दीड लाखांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. कुंभमेळ्यासाठी सर्व नियमांचं पालन केलं जात असलं तरी तज्ञांनी गर्दी करु नये आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन करण्याच्या सूचना केल्या आहेत. अनेक भक्तांनी याठिकाणी गाईडलाइन्सचं पालन करणं शक्य नसल्याचं सांगितल आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हरिद्धारमध्ये गेल्या २४ तासांच ३८६ करोना रुग्ण आढळले आहेत. शहरात सध्या २०५६ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. दैनंदिन आणि अॅक्टिव्ह रुग्णसंख्येत जवळपास १०० टक्क्यांनी वाढ झाली आहे. ४ एप्रिलला शहरात १७३ रुग्ण आढलले होते तर अॅक्टिव्ह रुग्णसंख्या ८३७ होती.