scorecardresearch

Aadhaar Leak : ट्राय प्रमुखांच्या अडचणीत वाढ, मुलीला धमकी

… तर २४ तासांमध्ये परिणाम भोगायला तयार राहा, ट्राय प्रमुखांच्या मुलीला धमकी

Trai Chairman R S Sharma
Trai Chairman R S Sharma (फोटो क्रेडिट – इंडियन एक्सप्रेस)
आधार क्रमांक सार्वजनिक करुन सोशल मीडियावर हॅकर्सना आव्हान देणं भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण ट्राय (Trai) चे चेअरमन आर एस शर्मा यांच्या चांगलंच अंगलट आलं आहे. कारण, मोबाइल नंबर, बँक अकाउंट यांसारखी महत्त्वाची माहिती सार्वजनिक झाल्यानंतर आता त्यांच्या मुलीला इ-मेलद्वारे धमकी मिळाली असून खंडणीची मागणी करण्यात आली आहे.

धमकीच्या इ-मेलमध्ये, ‘शर्मा यांचं इ-मेल अकाउंट हॅक झालं आहे आणि त्यांचं पंजाब नॅशनल बॅंकेचं खातंही लवकरच हॅक होण्याचा धोका आहे. सोशल मीडियावर चॅलेंज देऊन शर्मा यांनी हॅकर्सना निमंत्रण दिलं आहे आणि देशाची मान शरमेने झुकवली आहे. जर शर्मा यांनी त्यांचं अकाउंट डिलीट केलं नाही तर त्यांच्या महत्त्वाच्या फाइल्स सार्वजनिक करु, तसंच त्यांच्या फोनमध्ये व्हायरस सोडला जाईल. २४ तासांमध्ये इ-मेलला उत्तर नाही तर परिणाम भोगायला तयार राहा’ असं म्हटलंय. इ-मेलमध्ये खंडणीची मागणीही करण्यात आली आहे. द वायरने याबाबतचं वृत्त दिलं आहे.

या सर्व प्रकरणाची सुरूवात दोन दिवसांपूर्वी आर एस शर्मा यांनी आधार क्रमांक (Aadhaar number) सार्वजनिक केल्यानंतर झाली. आधार क्रमांक सार्वजनिक केल्याने गोपनीयतेला धक्का पोहोचत नाही किंवा माहिती हॅक करता येत नाही, असा दावा केला होता. आपल्याला यामुळे कोणतीही हानी होऊ शकत नाही. तसे असेल तर हॅक करुन दाखवा, असं चँलेंजच शर्मा यांनी नेटिझन्सना दिलं होतं. त्यानंतर अनेक हॅकर्सनी शर्मा यांच्या गोपनीय माहिती मिळवल्याचा दावा केला. इलियट अँडरसन या फ्रान्सच्या सुरक्षा तज्ज्ञाने तर शर्मा यांची बरीच गोपनीय माहिती उघड केली. एथिकल हॅकर्स या ग्रुपने तर थेट शर्मा यांचे बॅंक डिटेल्स मिळवून पेटीएम आणि भिम अॅपद्वारे १ रुपया पाठवल्याचा स्क्रिनशॉटही शेअर केला.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Threat emailed to daughter of trai chairman sharma after he provokes hackers

ताज्या बातम्या