उत्तराखंडमधील रुडकी रेल्वे स्थानकाच्या अधीक्षकांना रेल्वे स्थानकं उडवून देण्याची धमकी देणारं पत्र मिळालं आहे. लक्सर, नजीबाबाद, डेहराडून, रुडकी, ऋषिकेश आणि हरिद्वार ही रेल्वे स्थानके उडवून देण्याची धमकी या पत्रामधून देण्यात आली आहे. धमकीचे पत्र पाठणाऱ्याने तो स्वतः दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचा एरिया कमांडर सलीम अन्सारी असल्याचा उल्लेख केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

  शनिवारी संध्याकाळी रुडकी रेल्वे स्टेशनच्या अधीक्षकांना धमकीचे पत्र मिळालं. हे पत्र अत्यंत तुटक हिंदीत लिहिलेलं असल्याची माहिती समोर आली आहे . यामध्ये उत्तराखंडच्या ६ रेल्वे स्थानकांसोबतच हरिद्वारमधील मनसा देवी, चंडी देवी आणि अन्य धार्मिक स्थळांनाही बॉम्बस्फोटाद्वारे उडवण्याची धमकी दिली आहे. या पत्रात उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांचासुद्धा उल्लेख आहे. हे पत्र मिळाल्यानंतर सर्व ६ ठिकाणांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

यापूर्वीसुद्धा अशी धमकीची पत्रे आल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्यांकडून मिळाली आहे. २०१९ मध्येसुद्धा रुडकी रेल्वे स्टेशन अधीक्षकांना असंच धमकी देणारं पत्र आलं होतं. पोलिसांनी यापूर्वी मिळालेल्या अशा धमकीच्या पत्रांचे हस्ताक्षर जुळवून बघितलं आहे. 

या संदर्भात अधिक माहिती देताना उत्तराखंडचे डीजीपी अशोक कुमार म्हणाले की, रुडकी रेल्वे स्थानक अधीक्षकांना ७ मे रोजी संध्याकाळी लक्सर, नजीबाबाद, डेहराडून, रुडकी, ऋषिकेश आणि हरिद्वार ही ६ रेल्वे स्थानके उडवून देण्याची धमकी देणारं पत्र मिळालं.जैशचा एरिया कमांडर सलीम अंसारी या नावाने धमकीचे पत्र पाठवण्यात आलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Threat to blow up 6 railway stations including haridwar letter received from station superintendent pkd
First published on: 09-05-2022 at 12:53 IST