इसिस या दहशतवादी गटाच्या तीन संशयित अतिरेक्यांना अटक केल्याचा दावा पाकिस्तानी कायदा अंमलबजावणी संस्थांनी केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, असमतुल्ला व अबजुर रेहमान या दोघांना अटक करण्यात आली असून ते अफगाणिस्तानातील आहेत तर तिसरा महमंद इब्राहिम पंजाब प्रांतातील आहे. गुप्तचर संस्थांनी संशयित अतिरेक्यांचे दूरध्वनी संदेश पकडले होते, त्यांच्यावर छापे टाकून अटक करण्यात आली. त्यांचे लॅपटॉप जप्त करण्यात आली असून त्यांचे दानेश (इसिस) नेत्यांशी संबंध असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांच्याकडे पाकिस्तानमधील पंजाबचे नकाशे सापडले आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 6th Jul 2015 रोजी प्रकाशित
इसिसच्या तीन अतिरेक्यांना पाकिस्तानात अटक
इसिस या दहशतवादी गटाच्या तीन संशयित अतिरेक्यांना अटक केल्याचा दावा पाकिस्तानी कायदा अंमलबजावणी संस्थांनी केला आहे.

First published on: 06-07-2015 at 05:50 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Three isis terrorist arrest in pakistan