three militants killed in encounter in Jammu kashmir Shopian Operation Keller : दक्षिण काश्मीरमधील शोपियानमध्ये सुरू असलेल्या चकमकीत किमान तीन दहशतवादी ठार झाले आहेत. मंगळवारी सकाळी या भागात गोळीबाराचे आवाज ऐकू आले होते. तसेच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने या भागात दहशतवादी असल्याची पुष्टी केली होती, त्यानंतर करण्यात आलेल्या कारवाईदरम्यान सुरक्षा दल आणि दहशतावाद्यांमध्ये चकमक सुरू आहे.

ऑपरेशन केल्लर

भारतीय लष्कराने सोशल मीडियावर पोस्ट करत या कारवाईबद्दल माहिती दिली आहे. या मोहिमेला ‘ऑपरेशन केल्लर’ (OPERATION KELLER) असे नाव देण्यात आले आहे. भारतीय लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, १३ मे २०२५ रोजी, राष्ट्रीय रायफल्स युनिटला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे , शोपियानमधील शोएकल केल्लर परिसरात दहशतवादी असल्याची माहिती मिळाली होती. यानंतर भारतीय सैन्याने या भागात शोध मोहीम सुरू केली. या मोहिमेदरम्यान दहशतवाद्यांनी जोरदार गोळीबार केला. या भीषण चकमकीत तीन कट्टर दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. ऑपरेशन सुरू आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल (१२ मे) रोजी देशाला केलेल्या संबोधनामध्ये दहशतवाद्यांना सडेतोड उत्तर दिले जाईल असे ठणकावले होते. यानंतर ही कारवाई केली जात आहे. पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २६ जणांचा मृ्त्यू झाला होता, यानंतर भारताना पाकिस्तान आणि पीओकेमधील दहशतावादी तळांना लक्ष्य केले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जम्मू आणि काश्मीरमधील बांदीपोरा जिल्ह्यात दोन आठवड्यांपूर्वी झालेल्या चकमकीत हिजबुल मुजाहिदीनच्या एका दहशतवाद्याच्या भावाला ठार करण्यात आले होते. त्याचे दहशतवाद्यांशी संबंध होते असे अधिकार्‍यांनी सांगितले.