मेघालयातील ईस्ट गारो हिल्स जिल्ह्यामध्ये पोलीसांनी केलेल्या कारवाईत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आले. या ठिकाणी एका दहशतवाद्याला पोलीसांनी जिवंत पकडले असून, एक जण तेथून पळून जाण्यात यशस्वी ठरला.
हे सर्व दहशतवादी युनायटेड ए चिक लिबरेशन आर्मीचे होते. पोलीसांच्या विशेष पथकाने संपलग्रे भागामध्ये संशयित ठिकाणी टाकलेल्या छाप्यामध्ये या दहशतवाद्यांवर कारवाई करण्यात आली. पोलीस महासंचालक नॉंगप्लूह यांनी ही माहिती दिली. पोलीसांच्या कारवाईत जखमी झालेल्या दहशतवाद्याला अटक करण्यात आली आहे. मेघालयातील एएनव्हीसी गटाचा माजी नेता नोरोक हा या कारवाईच्यावेळी पळून जाण्यात यशस्वी ठरला, असेही ते म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Three militants shot dead in meghalaya
First published on: 28-11-2013 at 03:40 IST