scorecardresearch

Tirumala Tirupati Ticket: तिरुपती मंदिरात दर्शनासाठी मिळणार स्पेशल तिकीट; जाणून घ्या किंमत

Tirumala Tirupati Special Darshan Ticket: जानेवारी, फेब्रुवारी महिन्यासाठी तिरुपती मंदिरात दर्शनासाठी स्पेशल तिकीट उपलब्ध होणार

Tirumala Tirupati Ticket: तिरुपती मंदिरात दर्शनासाठी मिळणार स्पेशल तिकीट; जाणून घ्या किंमत
तिरुपती मंदिरात दर्शनासाठी उपलब्ध होणार स्पेशल तिकीट (संग्रहित छायाचित्र)

Tirupati Online Ticket Booking: जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात तिरुमला तिरुपती देवस्थानाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी दर्शनासाठी स्पेशल तिकीटची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. हे तिकीट बूक करण्यासाठी ऑनलाईन प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आली आहे. या दर्शनाच्या एका तिकिटाची किंमत ३०० रुपये असणार आहे.

तिरुमला तिरुपती देवस्थान भारतातील प्रसिद्ध देवस्थान आहे. इथे भगवान वेंकटेश्वर स्वामी यांचे दर्शन घेण्यासाठी अनेक भाविक दूरचा प्रवास करून येतात. अशावेळी दर्शनासाठी आधीच बूकिंग उपलब्ध असेल, तर त्यांच्यासाठी अधिक सोयीचे होते. यासाठी ही स्पेशल तिकीटची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.

आणखी वाचा: कोविडबाबत चीनची अरेरावी सुरूच; करोना धोरणावर टीका करणाऱ्यांचे सोशल मीडिया अकाऊंट्स केले बंद!

दरम्यान तिरूमला येथे वैकुंठद्वाराचे दर्शन सूरु आहे. २ ते ११ जानेवारी असा १० दिवसांचा वैकुंठ एकादशीचा कालावधी आहे. श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात दररोज ५०,००० हून अधिक भाविक दर्शनासाठी येतात. जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यासाठीचे बुकिंग ऑनलाईन सुरू करण्यात आल्याने, त्याचा भाविकांनी लाभ घ्यावा अशी माहिती देण्यात आली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 09-01-2023 at 11:08 IST

संबंधित बातम्या